मुंबई - बॉलिवूडमध्ये २००४ साली इमरान हाश्मीचा 'मर्डर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून त्याला सर्व 'सीरिअल किसर' या नावानेच ओळखतात. एकापाठोपाठ एक आलेल्या चित्रपटात त्याने किसिंग सिन्स दिले. त्यामुळे त्याची तशी प्रतिमाच निर्माण झाली आहे. मात्र, 'सीरिअल किसर'चा हा टॅग आपल्यासाठी त्रासदायक असल्याचं इमरान हाश्मीने म्हटलं आहे.
'माझ्या चित्रपटात कथा, सादरीकरण, संगीत सर्वकाही असतं. तरीही प्रेक्षक फक्त एका गोष्टीमुळे मला ओळखतात. हे खरंच त्रासदायक आहे. चित्रपटातील एका शुल्लक गोष्टीवरुन संपूर्ण चित्रपटाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही', असे इमरानने म्हटले आहे.
-
Boss ❤️ @emraanhashmi pic.twitter.com/X8XEQXrUqj
— Emraan Hashmi (@vishalKKC) November 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Boss ❤️ @emraanhashmi pic.twitter.com/X8XEQXrUqj
— Emraan Hashmi (@vishalKKC) November 19, 2019Boss ❤️ @emraanhashmi pic.twitter.com/X8XEQXrUqj
— Emraan Hashmi (@vishalKKC) November 19, 2019
हेही वाचा -इमरान हाश्मीच्या 'द बॉडी' चित्रपटाचं पहिलं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित
इमरानने 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई', 'द डर्टी पिक्चर', 'शांघाय', 'अजहर', 'बादशाहो' आणि 'टायगर्स' यांसारख्या चित्रपटातून त्याची सीरिअल किसरची प्रतिमा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजमधील त्याच्या भूमिकेची प्रशंसाही करण्यात आली आहे.
लवकरच तो महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'चेहरे' या चित्रपटातही भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या त्याचा आगामी 'द बॉडी' हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. १३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
-
Death is not always the end. #TheBody Official Trailer out now! In Cinemas this December, Friday 13th https://t.co/T491jf6u7r@chintskap @vedhika4u @sobhitaD @jeethu007 @TheBodyMovie @Viacom18Studios @iAmAzure, @AndhareAjit @SunirKheterpal @TSeries@khannasunny
— Emraan Hashmi FC (@EmraanHashmiFC) November 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Death is not always the end. #TheBody Official Trailer out now! In Cinemas this December, Friday 13th https://t.co/T491jf6u7r@chintskap @vedhika4u @sobhitaD @jeethu007 @TheBodyMovie @Viacom18Studios @iAmAzure, @AndhareAjit @SunirKheterpal @TSeries@khannasunny
— Emraan Hashmi FC (@EmraanHashmiFC) November 15, 2019Death is not always the end. #TheBody Official Trailer out now! In Cinemas this December, Friday 13th https://t.co/T491jf6u7r@chintskap @vedhika4u @sobhitaD @jeethu007 @TheBodyMovie @Viacom18Studios @iAmAzure, @AndhareAjit @SunirKheterpal @TSeries@khannasunny
— Emraan Hashmi FC (@EmraanHashmiFC) November 15, 2019
हेही वाचा -'दबंग' म्हणजे नक्की काय? भाईजानने दिलं उत्तर
या चित्रपटाचं दिग्दर्शन जितू जोसेफ यांनी केलं आहे. हा स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटातील भूमिकेविषयी देखील इमरानने आपलं मत व्यक्त केलं. थ्रिलर सस्पेन्स चित्रपटात भूमिका साकारायला आवडत असल्याचंही तो म्हणाला. अशा चित्रपटांमध्ये अभिनयाला वाव असतो. अॅक्शन चित्रपटात फक्त तुमच्या शरीरयष्टीवर लक्ष दिलं जातं. मात्र, थ्रिलर ड्रामा चित्रपटात खरं अभिनयकौशल्य असावं लागतं. त्यामुळेच मला अशाप्रकारचे चित्रपट साकारायला आवडतात, असे तो म्हणाला.