ETV Bharat / sitara

सारा अलीने शेअर केली फिल्मफेअरची झलक, शनायाच्या फोटोमुळे इंटरनेटवर वादळ - शनाया कपूर

सारा अली खानने तिच्या फिल्मफेअर परफॉर्मन्सची एक झलकसोशल मीडियावर दाखवली आहे. तर अभिनेत्री शनाया कपूरने आपला आकर्षक मोनोकिनी फोटो पोस्ट केला आहे.

Shanaya stuns in monokini
शनायाच्या फोटोमुळे इंटरनेटवर वादळ
author img

By

Published : Apr 8, 2021, 3:04 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने २७ मार्च रोजी मुंबईत पार पडलेल्या ६६ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये परफॉर्मन्स सादर केला. अवॉर्ड सोहळ्याचे प्रसारण होण्यापूर्वी साराने आपल्या परफॉर्मन्सची एक झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे. दरम्यान अभिनेत्री शनाया कपूरने आपला आकर्षक मोनोकिनी फोटो पोस्ट केला आहे.

बुधवारी साराने आपल्या सिग्नेचर रायमिंग कॅप्शनसह इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये तिच्या मेकअप पासून ते स्टेजवर परफॉर्मन्स करीत असतानाची झलक दिसते.

दरम्यान, आणखी एक स्टार किड शनाया कपूरने पुन्हा इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. तिच्या आश्चर्यकारक फोटोंमुळे तापमान वाढवले ​​आहे. अभिनेता संजय आणि महीप कपूर यांची मुलगी असलेल्या शनायाने मोनोकिनीमधील एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा - "आमिर खान परफेक्शनिस्ट नाही", वाचा असं का म्हणली 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा

चित्रपटांचा विचार करता सारा अली आगामी ‘इमॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात विकी कौशलसोबत काम करणार आहे. यामध्ये तिचे काही अॅक्शन सीन्सही असल्याचे समजते.

शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत असल्याची बातमी आम्ही तुम्हाला यापूर्वी दिली आहे. येत्या जुलै महिन्यात ती रुपेरी पडद्यासाठी काम सुरू करेल. स्टार किड्सचा गॉडफादर करण जोहर तिला आपल्या धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने लॉन्च करेल.

शनायाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिने जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटाच सहाय्यकांपैकी एक म्हणून काम केले आहे आणि बहुचर्चित ‘नेटफ्लिक्स’ मालिकेत ‘फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ह्स’ या मालिकेतही काम केले आहे. ती निर्माता बोनी कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची भाची असून अभिनेत्री सोनम कपूर, हर्षवर्धन कपूर आणि जान्हवी कपूर यांची चुलत बहीण आहे.

हेही वाचा - पदार्पणच्या सिनेमात शनाया कपूरचा गुरफाते पीरजादा आणि लक्ष्या लालवाणीसोबत प्रेमाचा त्रिकोन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.