मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची जोडी असलेला 'लव्ह आज कल' हा चित्रपट येत्या 'व्हॅलेन्टाईन डे'ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि कार्तिकची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळाली. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच दोघांच्या जोडीची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ वाढली आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांनी चाहत्यांना एक नवे चॅलेंज दिले आहे.
सारा आणि कार्तिक दोघांनीही एक टीकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांनी चाहत्यांना 'टिम्बी ट्विस्ट' असे चॅलेंज दिले आहे. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या आगामी 'लव्ह आज कल' चित्रपटातील 'हां मै गलत' गाण्याच्या संगीतावर डान्स करताना दिसतात. मात्र, यामध्ये एक ट्विस्ट आहे. या संगीतावर तोंडात लिंबू चमचा घेऊन डान्स करायचा आहे. लिंबू खाली न पडू देता गाण्याच्या स्टेप जुळवण्याचे चॅलेंज त्यांनी दिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'दबंग गर्ल'ची डिजीटल विश्वात एन्ट्री, गुन्हेगारीवर आधारित वेबसीरिजमध्ये साकारणार भूमिका
कार्तिकसोबत डान्स करताना सारा हे चॅलेंज हरली आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या या हावभावाचे कौतुक केले आहे.
'लव्ह आज कल' या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे त्यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते देखील आतूर आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री आरुषी शर्माचीही यामध्ये मुख्य भूमिका आहे. दोन काळातील प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट सिनेमागृहात काय कमाल दाखवतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -मनीष मल्होत्राच्या फॅशन इव्हेंटमध्ये कार्तिक सोबत करिनाचा ग्लॅमरस अंदाज, पाहा व्हिडिओ