ETV Bharat / sitara

'सत्तेसाठी लढा असलेला साक्षीदार', संजय दत्तच्या 'प्रस्थानम'चा टीजर प्रदर्शित - भूज - द प्राईड ऑफ इंडिया

गेल्या काही दिवसांपासून 'प्रस्थानम' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. संजय दत्त या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 'प्रस्थानम' नावाच्याच तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे.

'सत्तेसाठी लढा असलेला साक्षीदार', संजय दत्तच्या 'प्रस्थानम'चा टीजर प्रदर्शित
author img

By

Published : Jul 29, 2019, 5:09 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'बाबा' म्हणजेच संजय दत्त याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त कलाविश्वातून तसेच चाहत्यांकडुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'प्रस्थानम' या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'प्रस्थानम' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. संजय दत्त या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 'प्रस्थानम' नावाच्याच तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. देवा कट्टा हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांनीच तेलुगू चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं.

काही दिवसांपूर्वीच संजयने या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं होतं. जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या चित्रपटाच्या टीजरमध्ये सर्व कलाकारांची झलक पाहायला मिळते. या टीजरमधील संजय दत्तचा 'हक दोगे तो रामायण शुरू होगी, छिनोगे तो महाभारत' हा डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घतो. संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे.

या चित्रपटात संजयशिवाय मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अमायरा दस्तूर आणि अली फजल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. 'प्रस्थानम' चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाबरोबरच संजय दत्त त्याच्या आगामी 'पानिपत' आणि 'शमशेरा' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच, 'भूज - द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटातही तो महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

मराठी सीनेसृष्टीतही पदार्पण
संजय दत्तने मराठी सीनेसृष्टीतही पदार्पण केले आहे. त्याच्या निर्मितीखाली तयार होणारा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' हा देखील २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याने त्याचा हा पहिलाच चित्रपट त्याचे वडील सुनील दत्त यांना अर्पण केला आहे. या चित्रपटात वडील आणि मुलाचे भावविश्व रंगविण्यात आले आहे. या चित्रपटाची देखील प्रेक्षकांना आतुरता आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.