मुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या 'दबंग ३' चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सलमान खानने या चित्रपटातील २ गाणी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहेत. आता या चित्रपटाची थिम असलेलं पॉवर पॅक गाणं 'हुड हुड दबंग' हे गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'हुड हुड दबंग आधी ऐकवलं आता दाखवणार आहे. विश्वास आहे की तुम्ही स्वागत नक्की करणार', असं कॅप्शन देऊन त्याने या गाण्याची झलक शेअर केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
लखनऊ मध्ये या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं आहे. या गाण्यात सलमान खानचा अनोखा स्वॅग पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. तर, या चित्रपटातील एक गाणं सलमान खाने स्वत: गायलं आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर यांचीदेखील मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रभू देवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.