ETV Bharat / sitara

करण देओलच्या सिनेमाबद्दल सलमानने केले ट्विट, सनी देओलने दिले उत्तर - सनी देओलने रिट्विट करीत

सलमान खानने सनी देओलचा मुलगा करण देओलच्या 'पल पल दिल के पास' चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला आहे. याला सनी देओलने रिट्विट करीत आभार मानले आहेत.

सलमाने केले ट्विट, सनी देओलने दिले प्रत्युत्तर
author img

By

Published : Sep 6, 2019, 4:07 PM IST

Updated : Sep 7, 2019, 10:54 AM IST

सलमान खान आणि धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचे नाते अगदी घट्ट आहे. धर्मेंद्र तर सलमानचे भरपूर लाड करीत असतात. म्हणूनच तर 'यमला पगला दीवाना' चित्रपटाच्या तिसऱ्या भागात सलमान पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता. सध्या सनी देओलचा मुलगा करण देओलचा 'पल पल दिल के पास' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाला शुभेच्छा देणारे ट्विट सलमानने केले असून ते आता व्हायरल झालं आहे.

'पल पल दिल के पास' या चित्रपटातून करण देओल आणि सेहर बाम्बा बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. सलमानने ट्रेलर ट्विट केला असून कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''या पिढीची सर्वात मोठी प्रेम कथा. ऑल द बेस्ट. सादर करीत आहे 'पल पल दिल के पास'चा ट्रेलर.''

सलमानच्या या ट्विटला करणचे वडिल सनी देओलने उत्तर दिले आणि आभारही मानले आहेत. तर अशा प्रकारे सलमानने आपल्या चाहत्यांना 'पल पल दिल के पास' चित्रपट पाहण्याचा सल्ला दिलाय.

'पल पल दिल के पास' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सोनम कपूरच्या द झोया फॅक्टर चित्रपटासोबत २० सप्टेंबरला टक्कर होणार आहे. करण देओल हे नाव सनी, बॉबी आणि धर्मेंद्र यांच्यासारखे लोकप्रिय होणार का हे लवकरच ठरेल.

Intro:Body:

ent

Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 10:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.