मुंबई - बॉलिवूडस्टार सलमान खानच्या वाढदिवशी बहीण अर्पिताने त्याला अनोखी भेट दिली आहे. २७ डिसेंबरला अर्पिताला कन्यारत्न प्राप्त झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात तिने मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव आयत ठेवण्यात आले आहे. आता तिला रुग्णालयातून सुट्टी मिळाली असून घरी तिचे आणि बाळाचे जंगी स्वागत करण्यात आले.
अर्पिता रुग्णालयातून बाहेर पडत असतानाचा फोटो आणि व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. सोशल मीडियावर खान आणि शर्मा परिवाराकडून आयतच्या स्वागताची तयारीचे काही फोटो प्रसिध्द करण्यात आले आहेत.
- View this post on Instagram
Welcome home @arpitakhansharma AHIL & AYAT Thank you @balloon.blushh .. it’s really special
">
अर्पितासोबत तिचा पती आयुष शर्मा आणि तीन वर्षाचा मुलगा आहिल दिसत आहे. आयुषच्या हातामध्ये छोटी आयत दिसत आहे.
आयुषने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''या सुंदर जगात तुझे स्वागत आहे आयत. तू आमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आली आहेस. सर्वांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद देऊ शकतेस.''
आयतचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
सलमाननेही एक ट्विट करीत अर्पिताला थँक यू म्हटलंय. सलमानने लिहिलंय, ''या सुंदर जगात तुझे स्वागत आहे. या कुटुंबाला बर्थडे गिफ्ट दिल्याबद्दल अर्पिता आणि आयुषचे आभार. ही पोस्ट जितके लोक वाचतील ते आयतला आशीर्वाद देतील. सर्वांचे नाव रोशन करेल अशी आशा करतो. प्रेम आणि आदराबद्दल धन्यवाद. सर्वांचा आभारी आहे.''