ETV Bharat / sitara

प्रदर्शनापूर्वी चुलबुल पांडे आणि खुषीची रोमॅन्टिक झलक, पाहा 'दबंग ३' चं 'आवारा' गाणं - sai manjarekar romance with salman khan

इंडियन ऑयडॉलचा विजेता सलमान अली आणि मुस्कान यांनी हे गाणं गायलं आहे. तर, साजिद-वाजिद यांच्या जोडीने या गाण्याला संगीत दिले आहे.

Dabangg3 song Awara
प्रदर्शनापूर्वी चुलबुल पांडे आणि खुषीची रोमॅन्टिक झलक, पाहा 'दबंग ३' चं 'आवारा' गाणं
author img

By

Published : Dec 19, 2019, 6:05 PM IST

मुंबई - सलमान खानचा 'दबंग ३' हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी या चित्रपटातील चुलबुल पांडे आणि खुषी म्हणजेच सलमान खान आणि सई मांजरेकरची रोमॅन्टिक झलक असेललं 'आवारा' गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. सलमान खानने या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यापूर्वी त्याने या गाण्याचा ऑडिओ शेअर केला होता.

'हम और हमारी खुशी, लेकर आये है हमारे रोमान्स का फसाना', असे कॅप्शन सलमानने या व्हिडिओवर दिले आहे. इंडियन ऑयडॉलचा विजेता सलमान अली आणि मुस्कान यांनी हे गाणं गायलं आहे. तर, साजिद- वाजिद यांच्या जोडीने या गाण्याला संगीत दिले आहे. समीर अंजान आणि साजिद यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याच्या ऑडिओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळे व्हिडिओ गाण्याची चाहत्यांना आतुरता होती.

हेही वाचा -चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'दंबग ३'ची टीम हैदराबादमध्ये दाखल

'दबंग ३' चित्रपटात चुलबुल पांडेच्या लग्नापूर्वीची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये सई मांजरेकर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हाने त्याची पत्नी 'रज्जो'ची भूमिका साकारली आहे. सलमानने तिच्यासोबतचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यातील हुड हुड दबंग या गाण्यावरून काही वाद निर्माण झाले होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी या गाण्यातील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. प्रभूदेवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा -'महाभारता'तील शकुनी मामासोबत ईटीव्ही भारतची खास बातचीत

Intro:Body:

Salman khan share video song of Dabangg3 song Awara

Awara song from Dabangg3 release, Salman khan share Awara song, Awara song release, Awara song video, चुलबुल पांडे आणि खुषीची रोमॅन्टिक झलक, 'दबंग ३' चं 'आवारा' गाणं, sai manjarekar romance with salman khan, sai manjarekar as khushi

प्रदर्शनापूर्वी चुलबुल पांडे आणि खुषीची रोमॅन्टिक झलक, पाहा 'दबंग ३' चं 'आवारा' गाणं

मुंबई - सलमान खानचा 'दबंग ३' हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी या चित्रपटातील चुलबुल पांडे आणि खुषी म्हणजेच सलमान खान आणि सई मांजरेकरची  रोमॅन्टिक झलक असेललं 'आवारा' गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. सलमान खानने या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यापूर्वी त्याने या गाण्याचा ऑडिओ शेअर केला होता.

'हम और हमारी खुशी, लेकर आये है हमारे रोमान्स का फसाना', असे कॅप्शन सलमानने या व्हिडिओवर दिले आहे. इंडियन ऑयडॉलचा विजेता सलमान अली आणि मुस्कान यांनी हे गाणं गायलं आहे. तर, साजिद- वाजिद यांच्या जोडीने या गाण्याला संगीत दिले आहे. समीर अंजान आणि साजिद यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याच्या ऑडिओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळे व्हिडिओ गाण्याची चाहत्यांना आतुरता होती.

'दबंग ३' चित्रपटात चुलबुल पांडेच्या लग्नापूर्वीची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये सई मांजरेकर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हाने त्याची पत्नी 'रज्जो'ची भूमिका साकारली आहे. सलमानने तिच्यासोबतचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यातील हुड हुड दबंग या गाण्यावरून काही वाद निर्माण झाले होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी या गाण्यातील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. प्रभूदेवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.