ETV Bharat / sitara

चाहत्यांचे 'भारत'वरील प्रेम पाहून सलमान भारावला, दुसऱ्याच दिवशी पार केलं अर्धशतक - collection

'भारत' चित्रपट भारतात ४७०० स्क्रिन्सवर झळकला आहे. या चित्रपटात सलमान खानचे विविध पाच भूमिका पाहायला मिळत आहेत. त्याच्यासोबतच कॅटरिना कैफच्याही करिअरमधला हा सर्वाधिक ओपनर असलेला चित्रपट ठरला आहे.

चाहत्यांचे 'भारत'वरील प्रेम पाहून भारावला सलमान खान, दुसऱ्याच दिवशी पार केलं अर्धशतक
author img

By

Published : Jun 7, 2019, 9:59 AM IST

मुंबई - सलमान खानचा 'भारत' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिस गाजवायला सुरुवात केली आहे. 'भारत'ने पहिल्याच दिवशी सलमानच्या ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड पार करत ४२.०३ कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशीदेखील चाहत्यांच्या सिनेमागृहात अक्षरश: उड्या पडल्या. चाहत्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे सलमान खान भारावला आहे. त्याने सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार व्यक्त करत एक ट्विट केलं आहे.

'भारत' चित्रपट हा सलमानच्या करिअरमधला आत्तापर्यंतचा सर्वात जास्त ओपनिंग असलेला चित्रपट ठरला आहे. ईदच्या सुट्टीचाही चित्रपटाला फायदा झाला. तर दुसऱ्या दिवशी देखील कमाईचा आकडा चांगला असल्याचे समीक्षकांनी म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी जवळपास ३० कोटींची कमाई करत 'भारत'ने दोनच दिवसात अर्धशतकापर्यंत मजल मारली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ७२.०३ कोटींची कमाई केली आहे.

सलमानने सोशल मीडियावर एका ट्विटमधून चाहत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आभार व्यक्त केले आहेत. त्याने लिहिलेय, की 'सर्वांना खूप धन्यवाद. आत्तापर्यंतच्या करिअरमधला हा चित्रपट माझा सर्वात मोठा ओपनर आहे. यापेक्षाही जास्त जेव्हा चित्रपटाच्या एका सीनमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना संपूर्ण थिएटरमधील प्रेक्षक सन्मानाने उभे राहतात, तो क्षण माझ्यासाठी सर्वात जास्त अभिमानाचा आहे. यापेक्षा जास्त आदर कोठेही नाही. जय हिंद'.

'भारत' चित्रपट भारतात ४७०० स्क्रिन्सवर झळकला आहे. या चित्रपटात सलमान खानचे विविध पाच भूमिका पाहायला मिळत आहेत. त्याच्यासोबतच कॅटरिना कैफच्याही करिअरमधला हा सर्वाधिक ओपनर असलेला चित्रपट ठरला आहे. आता आठवड्याच्या शेवटपर्यंत या चित्रपटाच्या कमाईत आणखी किती भर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Intro:Body:

ENT 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.