ETV Bharat / sitara

सईच्या आनंदासाठी भाईजान काहीही करण्यास तयार, पाहा व्हिडिओ - Salman Khan latest news

आयफा अवार्ड्स सोहळ्यात सलमानने सईची सर्वांना ओळख करुन दिली. त्यानंतरही सईने सलमानसोबत इतरही कार्यक्रमात हजेरी लावली.

सईच्या आनंदासाठी भाईजान काहीही करण्यास तयार, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Oct 22, 2019, 3:46 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'दबंग ३' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान सोबत महेश मांजरेकर यांची मुलगी सई ही देखील मुख्य भूमिकेत आहे. आयफा अवार्ड्स सोहळ्यात सलमानने तिची सर्वांना ओळख करुन दिली. त्यानंतरही सईने सलमानसोबत इतरही कार्यक्रमात हजेरी लावली. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सईच्या फोटोसमोर उभं राहुन भाईजान तिच्या आनंदासाठी काहीही करण्यासाठी तयार असल्याचं म्हणत आहे.

सई 'दबंग ३'मध्ये चुलबुल पांडेची प्रेयसी 'खुषी'ची भूमिका साकारत आहे. तर, सोनाक्षी सिन्हा या चित्रपटातही चुलबुल पांडेची पत्नी 'रज्जो'ची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा -'तानाजी - द अनसंग वॉरिअर'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख जाहीर

सलमानने या दोघींचीही खास ओळख करुन दिली आहे. त्यासाठी त्याने व्हिडिओही शेअर केले आहेत.

'दबंग ३'चा ट्रेलरही उद्या म्हणजे २३ ऑक्टोबरला प्रदर्शित केला जाणार आहे. प्रभु देवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'पागलपंती'मध्ये भरणार येड्यांची जत्रा, ट्रेलरही लवकरच होणार प्रदर्शित

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.