ETV Bharat / sitara

खिलाडी - भाईजानची टक्कर टळली, सलमान खानने जाहीर केली अक्षयच्या 'सूर्यवंशी'ची नवी रिलीज डेट - rohit shetty

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. तर, सलमान खानचा 'इन्शाल्ला' हा चित्रपटदेखील पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार होता.

खिलाडी - भाईजानची टक्कर टळली, सलमान खानने जाहीर केली अक्षयच्या 'सूर्यवंशी'ची नवी रिलीज डेट
author img

By

Published : Jun 12, 2019, 2:44 PM IST

मुंबई - अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांची पुढच्या 'ईद'ला होणारी टक्कर टळली आहे. आता खुद्द भाईजाननेच अक्षयच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सलमानच्या आधी अक्षयचा 'सुर्यवंशी' चित्रपट पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. तर, सलमान खानचा 'इन्शाल्ला' हा चित्रपटदेखील पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार होता. त्यामुळे अक्षय आणि सलमानच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार होती. मात्र, आता 'सूर्यवंशी' चित्रपट २७ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, सलमान खानचा 'इन्शाल्ला' हा 'ईद'च्या मुहूर्तावरच प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'सूर्यवंशी' चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहेत. तर, 'इन्शाल्ला' चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लिला भन्साळी हे करत आहेत.

अलिकडेच ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'भारत' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने १५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.