ETV Bharat / sitara

तब्बल तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर, लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू केले शुटिंग

author img

By

Published : Jun 29, 2020, 4:32 PM IST

लॉकडाऊनंतर गेली तीन महिन्यापासून सर्व प्रकाची शूटिंग थांबली आहेत. अनेका मालिकांचे एपिसोड प्रसारित होऊ शकले नाहीत तर सिनेमांची शूटिंग रखडली होती. आता नव्या नियमांसह शूटिंगला सशर्त परवानगी मिळाली आहे. अनेक कलाकृतींचे शूटिंग सुरू झाली आहेत. मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील तब्बल ३ महिन्याच्या अवधीनंतर शूटिंगच्या सेटवर हजेरी लावली आहे.

sai-tamhankar-
सई ताम्हणकर

मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कहोलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना सई ताम्हणकर खूप उत्साहित होती.

सई म्हणाली, “पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना खूप संमिश्र भावना आहेत. एकिकडे थोडीशी भीती आणि चिंता दाटून आली असतानाच मन खूप उत्साहित झालेले आहे. सेटवर डॉक्टर आहेत. रुग्णवाहिकाही बोलवण्यात आलीय. सेटवर आल्या-आल्या टेंपरेचर चेक करणे, सतत हात धूणे, सॅनिटायझर बाळगणे. अशा सेटवर सगळ्या सावधगिरीच्या उपाययोजना बाळगल्या जातायत. लोकांना टीव्हीवरचे तेचतेच एपिसोड पाहून कंटाळा आल्याने नव्या एपिसोडचे चित्रीकरण सुरू केले आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा आशिर्वाद असू द्या.”

दिलेली कमिटमेंट पूर्ण करणाऱ्यांमधली सई ताम्हणकर आहे, हे तिने याआधीही दाखवून दिले आहे. बॉलीवूड चित्रपट ‘मीमी’च्या सेटवर अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही, लॉकडाऊन होणार हे कळल्यावर दुखऱ्या पायासह सई मार्च महिन्यात रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. आताही लॉकडाउन उघडल्यावर निर्माते आणि प्रेक्षकांसाठी असलेली आपली बांधिलकी जपत, सई ताम्हणकर चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.