ETV Bharat / sitara

‘मीडियम स्पाइसी’ला सागर देशमुखचा झणझणीत तडका - Sagar Deshmukh

सागर देशमुख ‘मीडियम स्पाइसी’मध्ये दिसणार असून विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सागर देशमुख
author img

By

Published : Jul 22, 2019, 5:14 PM IST

अभिनेता सागर देशमुखने आपल्या दमदार अभिनयाने ‘भाई व्यक्ती की वल्ली’, ‘हंटर’ अशा चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. सागर आता मोहित टाकळकर यांच्या ‘मीडियम स्पाइसी’मध्ये दिसणार असून विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘हंटर’, ‘वाय झेड’ आणि ‘गर्लफ्रेंड’ नंतर सागरचा सई सोबत हा चौथा चित्रपट आहे.

याबद्दल विधि कासलीवाल म्हणाल्या, "होय, सागर ‘मीडियम स्पाइसी’ चा भाग असून याचा आम्हाला आनंद आहे. या चित्रपटात अनेक मनोरंजक व्यक्तिरेखा असून सागरची व्यक्तिरेखा या कथेचा एक अविभाज्य भाग आहे.’’

चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारल्यानंतर सागर सध्या डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर साकारत आहे.

शहरी जीवनातील नाते संबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे.

दरम्यान, नाट्य क्षेत्रात विविध पुरस्कार मिळवणारे नाटककार अशी मोहित टाकळकर यांची ओळख आहे, तर विधि कासलीवाल यांची ओळख आशय संपन्न व्यावसायिक चित्रपटांच्या निर्मात्या अशी आहे. ‘मीडियम स्पाइसी’ च्या निमित्ताने हे दोघे एकत्र येत असल्याने सर्वांच्या नजरा या कलाकृतीकडे असतील हे नक्की.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.