मुंबई - सांड की आँख चित्रपटाने आज एक वर्षाचा टप्पा गाठला आहे. त्यानिमित्त चित्रपटाशी निगडीत लोकांनी अनेक आठवणींना वाट मोकळी करून दिली.
हा चित्रपट देशातील वयोवृद्ध शार्पशूटर प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये भूमी पेडणेकर हिने चंद्रो तोमर तर, तापसी पन्नू हिने प्रकाशी तोमर यांचे पात्र साकारले आहे. तरुण वयात वयोवृद्ध महिलांचे पात्र साकारणे हे भूमी आणि तापसी दोघींसाठीही खूप आव्हानात्मक होते.
ही भूमिका साकारताना कोणती आव्हान आली याबाबत सांगताना भूमीने काही गोष्टी शअर केल्या आहे. हे पात्र रंगवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असे भूमी म्हणाली. कारण, वृद्धावस्थेतील पात्र साकारण्यासाठी विशिष्ट प्रकारचे मेकअप करण्यात आले होते. ते मेकअप हार्श होते. त्यामुळे भूमीच्या चेहऱ्यावर अॅलर्जी होऊन त्वचेचा काही भाग लाल झाला होता.
एखाद्या व्यक्तीचे हावभाव आणि वाढत्या वयानुरुप त्याचे पात्र साकारणे खूप कठीण होते. यासोबतच ठेठ हरियाणवी बोली बोलण्याचंही आव्हान होतं, अशी प्रतिक्रिया भूमीने यावेळी दिली. या चित्रपटाचा भाग होणं हे खूप स्पेशल होतं असंही भूमी यावेळेस म्हणाली. गेल्या काही वर्षात मेनस्ट्रीम सिनेमात खूप परिवर्तन आले आहे. माझ्या चित्रपटांनी त्या बदलासाठी मोलाचे योगदान दिले आहे. याबद्दल खरोखर खूप आनंद असल्याचे भूमी सांगते.
आज प्रेक्षक एंटरटेनमेन्टसह त्यातील कन्टेन्टलाही तितकंच महत्व देतात. त्यामुळेच काही वर्षात चित्रपटसृष्टीमध्ये चांगल्या स्क्रिप्ट आणि वेगवेगळ्या प्रयोगांसह नवनीव चित्रपटांची भर पडू लागली आहे. मीदेखील यामध्ये आपणही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केल्याचा आनंद आहे. या सर्वासाठी देवाचे आभार मानते, असेही भाव भूमीने यावेळी व्यक्त केले.
सध्या भूमी आपल्या पुढच्या चित्रपटाची तयारी करत असून ती लवकरच दुर्गावती चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे येत आहे.