ETV Bharat / sitara

'बाहुबली' फेम राजमौलींच्या नव्या सिनेमाने शूटिंग पूर्ण होण्याआधीच कमावले ४०० कोटी! - एस एस राजमौली यांच्या आगामी 'आरआरआर'

'बाहुबली' चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या आगामी 'आरआरआर' या चित्रपटाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अजून शूटिंगही पूर्ण झालेले नसताना, या चित्रपटाचा ४०० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. हा भारतीय सिने डिस्ट्रिब्युशनच्या क्षेत्रातील अनोखा विक्रम आहे.

S S Rajmouli
एस एस राजमौली
author img

By

Published : Feb 11, 2020, 5:53 PM IST

Updated : Feb 11, 2020, 7:15 PM IST

'बाहुबली' चित्रपटामुळे सर्व परिचित झालेल्या दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी 'आरआरआर' या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले आहे. यासाठी रामचरण, 'ज्युनियर एनटीआर' आणि अजय देवगणाला साईन केलंय. या चित्रपटाची सध्या भरपूर हवा आहे. अशातच ट्रेड विशेषज्ञ कोमल नहाटा यांनी एक ट्विट करुन सर्वांनाच चकित केलंय. त्यांच्या मते राजमौलींचा हा आगामी सिनेमा रिलीज पूर्वीच तब्बल ४०० कोटींचा व्यवसाय करेल.

  • .@ssrajamouli's #RRR shatters pre-release business of #Baahubali2 with huge margin. AP, Telangana collect record Rs215 cr. Karnataka rights sold-50cr. Overseas rights bought for 70 cr. #RRR would easily do the pre-release business of more than 400 Crores, South India & Overseas. pic.twitter.com/Nft0t7Cl9Q

    — Komal Nahta (@KomalNahta) February 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोमल नहाटा यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ''एस एस राजमौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने प्रिरिलीज बिझनेसच्याबाबतीत 'बाहुबली'चा विक्रम मोडला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात २५० कोटी, कर्नाटकात ५० कोटी रुपयामध्ये याचे अधिकार विकण्यात आले आहेत. तर ओव्हरसिज हक्क ७० कोटींना विकण्यात आलेत. अशा प्रकारे दक्षिण भारत आणि ओव्हरसिज यातून तब्बल ४०० कोटींचा व्यवसाय 'आरआरआर' रिलीज पूर्वीच करेल.''

यातून स्पष्ट होते की राजमौली पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपला जलवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही दिवसापूर्वीच बातमी आली होती की या चित्रपटासाठी अजय देवगण कोणतेही मानधन राजमौलींकडून स्वीकारणार नाही. अजयचा हा पहिलाच दाक्षिणात्य सिनेमा आहे.

'आरआरआर' हा चित्रपट पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रटाचा बहुतांश भाग शूट झाला आहे. चाहते आता या सिनेमाची प्रतीक्षा करीत असले, तरी त्यांना वर्षभर थांबावे लागणार आहे.

Intro:Body:

ent news

Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.