ETV Bharat / sitara

रायन गॉस्लिंग आणि ख्रिस इव्हान्स झळकणार नेफ्लिक्सच्या स्पाय थ्रिलर 'द ग्रे मॅन'मध्ये

'अ‍ॅव्हेंजरः एंडगेम'ची लेखक-दिग्दर्शक जोडी - रुसो ब्रदर्स यांनी ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर 'एक्सट्रॅक्शन'च्या भव्य यशानंतर रॅन गॉसलिंग आणि ख्रिस इव्हान्स यांना आगामी नेटफ्लिक्सवरील 'ग्रे मॅन’ या स्पाय थ्रिलरसाठी एकत्र आणण्याचे ठरवले आहे.

spy thriller for Netflix
स्पाय थ्रिलर 'द ग्रे मॅन'
author img

By

Published : Jul 18, 2020, 3:40 PM IST

लॉस एंजेलिस - हॉलीवूडचे स्टार रायन गॉस्लिंग आणि ख्रिस इव्हान्स हे स्पाय थ्रिलर 'द ग्रे मॅन'साठी अ‍ॅव्हेंजर्सः एन्डगेमचे दिग्दर्शक रुसो ब्रदर्ससोबत नेटफ्लिक्सच्या आगामी शोमध्ये एकत्र काम करणार आहेत.

हा चित्रपट मार्क ग्रीनेच्या २००९ च्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे आणि सुपारी घेऊन खून करणाऱ्या लॉन्ट हॅन्सेन (इव्हान्स), आणि माजी सीआयए ऑपरेटिव्ह कोर्टा जेंट्री (गोसलिंग) च्या भोवती गुंफण्यात आला आहे.

नेटफ्लिक्सने ठेवलेल्या उद्दीष्टांनुसार 200 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटपर्यंत जेम्स बाँडची नवीन फ्रँचाइज तयार करायचे ठरवले आहे.

डेडलाईननुसार जेम्स बाँड पातळीवरील पातळीवर आणि 200 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटपर्यंत नवीन फ्रँचायझी तयार करणे, हे नेटफ्लिक्सचे उद्दीष्ट आहे. रसो ब्रदर्स त्यांच्या एजीबीओ बॅनरद्वारे हा चित्रपट तयार करणार आहेत.

हेही वाचा - करिना कपूर 'वन लव्ह' या बॉब मार्लेच्या नव्या आवृत्ती जागतिक कलाकारांसह झळकणार

जो रस्सो यांनी या चित्रपटाची कथा एंडगेमचे पटकथा लेखक क्रिस्तोफर मार्कस यांच्यासोबत लिहिली असून स्टीफन मॅकफिली यांनी अंतिम मसुद्याला आकार दिला आहे.

रोब किर्चेनबॉमसाठी जो रोथ आणि जेफ किर्चेनबॉम यांच्यासह एजीबीओचा माइक लरोकादेखील निर्माता म्हणून काम करत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे शूटिंग लॉस एंजेलिसमध्ये जानेवारीत सुरू करण्याचे नियोजन केले असून जगातील इतर ठिकाणे अद्याप निश्चित व्हायची आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.