ETV Bharat / sitara

‘लॉ ऑफ लव्ह’ चित्रपटगृहात जाऊन पाहणाऱ्यांना मिळू शकते फ्री मध्ये ‘बुलेट’ !!

येत्या ४ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ‘लॉ ऑफ लव्ह’ हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमाचं औचित्य साधत निर्माते आणि अभिनेता जे. उदय यांनी ही भन्नाट संकल्पना योजली आहे. आपल्या प्रियजनांसोबत हा चित्रपट बघायला या आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा अशी ही संकल्पना आहे.

लॉ ऑफ लव्ह प्रेक्षकांसाठी बुलेटची ऑफर
लॉ ऑफ लव्ह प्रेक्षकांसाठी बुलेटची ऑफर
author img

By

Published : Jan 25, 2022, 7:57 PM IST

मुंबई - प्रत्येकाला, खास करून तरुण पिढीतील युवकांना, ‘टू-व्हीलर’ चं खूप आकर्षण असते. त्यातच मोटोरसायकलमध्ये अग्रणी आहे रॉयल एन्फिल्ड कंपनीची ‘बुलेट’ बाईक. ती घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं परंतु त्याची किंमत खूप जास्त असल्यामुळे अनेकांना ती विकत घ्यायला जमत नाही. आता त्यातील काहींची ‘बुलेट’ चे मालक होण्याची स्वप्नपूर्ती होऊ शकते. त्यांना फक्त एकंच करायचं आहे ते म्हणजे ४ फेब्रुवारी २०२२ ला प्रदर्शित होणारा चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमागृहात जाऊन पाहायचा आहे.

प्रेमाचा नवा अर्थ उलघडण्यासाठी येत्या ४ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ‘लॉ ऑफ लव्ह’ हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमाचं औचित्य साधत निर्माते आणि अभिनेता जे. उदय यांनी ही भन्नाट संकल्पना योजली आहे. आपल्या प्रियजनांसोबत हा चित्रपट बघायला या आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा अशी ही संकल्पना आहे.

बुलेट ही एक अशी गाडी आहे ज्याचं स्वप्न प्रत्येकजण बघतो. या स्वप्नाला वयाची किंवा अन्य कोणतीही सीमा नसते. याच गोष्टीचा विचार करत आगामी मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ च्या निर्मात्यांनी प्रेमाच्या महिन्यात आपल्या खास प्रेक्षकांना त्यांची स्वप्नवत बुलेट भेट देण्याचे आयोजन केले आहे. याबद्दल अभिनेते आणि निर्माते जे. उदय म्हणाले, "रॉयल एन्फिल्ड बाईकचं स्वप्न अनेकजण पहात असतात. पण त्याची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे आणि किंमत जरा जास्त असल्यामुळे सर्वानाच ती मोटारसायकल घेणे शक्य होत नाही. या लकी ड्रॉ स्पर्धेमार्फत आम्ही तब्बल ५० गाड्या महाराष्ट्रातील आपल्या रसिक प्रेक्षकांना देऊ इच्छित आहोत. याने त्यांचा व्हॅलेंटाईन आणखीनच खास होईल याची आम्हाला खात्री आहे. सोशल मीडियावर याबद्दलची अन्य माहिती वेळोवेळी देऊ. त्याकरीता ‘लॅा ॲाफ लव्ह’ च्या फेसबुक पेजला लाईक करा.”

वेदिका फिल्म क्रिएशन आणि जे. उदय निर्मित ‘लॉ ऑफ लव्ह’ येत्या ४ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - 'गेहराइयाँ'च्या प्रमोशनसाठी दीपिका पदुकोणने घातला ९० हजारांचा ब्लेझर ड्रेस पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.