मुंबई - आज शिवजयंती निमित्त तमाम शिवरायांच्या भक्तांसाठी रितेश देशमुख, नागराज मंजुळे आणि अजय-अतुल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची 'महागाथा' निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी आज केलाय. शिवरायांवर एक महाचित्रपट तिघे बनवण्यासाठी सज्ज झालेत.
रितेश देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्विट करून आपल्या या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. या व्हिडिओमध्ये एक वही पहिल्यांदा दिसते. यावर, ''रितेश देशमुख, अजय-अतुल आणि नागराज मंजुळे अभिमानाने सादर करीत आहेत..शिवाजी...राजा शिवाजी...छत्रपती शिवाजी ...महागाथा ही अक्षरे उमटतात.''
-
अभिमानाने सादर करत आहोत...
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या....
जय शिवराय !!@Nagrajmanjule @AjayAtulOnline pic.twitter.com/WIwnZHk3K0
">अभिमानाने सादर करत आहोत...
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2020
तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या....
जय शिवराय !!@Nagrajmanjule @AjayAtulOnline pic.twitter.com/WIwnZHk3K0अभिमानाने सादर करत आहोत...
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2020
तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या....
जय शिवराय !!@Nagrajmanjule @AjayAtulOnline pic.twitter.com/WIwnZHk3K0
म्हणजेच पहिला भाग - शिवाजी, दुसरा भाग - राजा शिवाजी, आणि तिसरा भाग - छत्रपती शिवाजी अशा तीन भागांमध्ये छत्रपतींचा इतिहास रुपेरी पडद्यावर या महागाथेतून माडला जाणार आहे.
आज शिवजयंतीच्या निमित्ताने या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यामुळे चाहत्यांमध्ये एक नवे स्फुरण चढले आहे. रितेशच्या ट्विटरवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
-
This is For you @Riteishd
— RiteishD Fan (@Riteish_fan) February 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I hope you like it.🚩🚩
All #Riteishdeshmukh fans retweet please #छ्त्रपती_शिवाजी_महाराज#ChhatrapatiShivajiMaharaj @riteishd_fans@NileshSonune14 @AmbadasBobde @MeMauli_ @umeshpatle2590 @VilasraoD @Riteishdians @Riteishdfc @MeDeshmukh @honeybhagnani pic.twitter.com/76TY4LZcl9
">This is For you @Riteishd
— RiteishD Fan (@Riteish_fan) February 19, 2020
I hope you like it.🚩🚩
All #Riteishdeshmukh fans retweet please #छ्त्रपती_शिवाजी_महाराज#ChhatrapatiShivajiMaharaj @riteishd_fans@NileshSonune14 @AmbadasBobde @MeMauli_ @umeshpatle2590 @VilasraoD @Riteishdians @Riteishdfc @MeDeshmukh @honeybhagnani pic.twitter.com/76TY4LZcl9This is For you @Riteishd
— RiteishD Fan (@Riteish_fan) February 19, 2020
I hope you like it.🚩🚩
All #Riteishdeshmukh fans retweet please #छ्त्रपती_शिवाजी_महाराज#ChhatrapatiShivajiMaharaj @riteishd_fans@NileshSonune14 @AmbadasBobde @MeMauli_ @umeshpatle2590 @VilasraoD @Riteishdians @Riteishdfc @MeDeshmukh @honeybhagnani pic.twitter.com/76TY4LZcl9
लगेचच रितेश फॅन क्लबवर एका चाहत्याने तयार केलेला व्हिडिओ दिसतो. यामध्ये रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करीत आहेत हे स्पष्ट होते. या चित्रकार चाहत्यांने छत्रपतींच्या भूमिकेत रितेश कसा दिसेल याचे लाईव्ह चित्र काढले आहे.
नागराज मंजुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महागाथेचे दिग्दर्शन करतील. नागराजनेही ट्विट करीत याला दुजोरा दिलाय.
-
एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की
— nagraj manjule (@Nagrajmanjule) February 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹 pic.twitter.com/r4GaizGCeE
">एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की
— nagraj manjule (@Nagrajmanjule) February 19, 2020
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹 pic.twitter.com/r4GaizGCeEएखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की
— nagraj manjule (@Nagrajmanjule) February 19, 2020
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹 pic.twitter.com/r4GaizGCeE
या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल या जोडीवर सोपवण्यात आलंय. त्यामुळे अत्यंत स्फुर्तीदायी कवने, पोवाडे यासह लोकसंगीताची स्फुर्तीदायक मेजवानी संपूर्ण महाराष्ट्राला मिळेल यात काही शंका नाही. २०२१ मध्ये हा चित्रपट चाहत्यांसाठी सिनेमागृहात दाखल होईल.