बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलिया आणि मुलांसह जंगल सफारीचा आनंद घेताना दिसला. जयपूर जवळील झालाना लेपर्ड सफारी त्याने केली. यावेळी त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. त्याच्या दोन्ही मुलांनी याचा भरपूर आनंद लुटला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रितेश देशमुखने आपल्या झालाना जंगल सफारीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो व्हिडिओ बनवताना दिसत आहे. जंगलात फिरताना कॉमेंट्री करीत तो आपला अनुभव सांगताना दिसत आहे.
४ जानेवारी रोजी रितेश पत्नी जेनेलियासह जंगल सफारीवर गेला होता. यावेळी त्याची दोन्ही मुले रियान आणि राहिल सोबत होती. जंगलात फिरताना दिसणाऱ्या प्रत्येक प्राण्यांना पाहून मुले टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करीत होती. मुलांचे हे कौतुक रितेश-जेनेलियाने डोळे भरुन पाहिले. काही वेळातच त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. शांतता बाळगत बिबट्याचे दर्शन सर्वांनी मिळून घेतले. यावेळी त्यांच्यासोबत वाइल्डलाइफ विशेषज्ञ धीरेंद्र गोदा सोबत होते.