ETV Bharat / sitara

रितेश देशमुखने शेअर केला 'बिग बीं'चा ३७ वर्षापूर्वीचा व्हिडिओ - कुली

३७ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन हे 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातातून सुखरुप परतले होते. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया होऊन ते घरी परतले होते.

रितेश देशमुखने शेअर केला 'बिग बीं'चा ३७ वर्षे जुना व्हिडिओ
author img

By

Published : Sep 26, 2019, 12:53 PM IST

मुंबई - सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. मात्र, या कधीकधी या व्हायरल व्हिडिओतून बऱ्याच आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा मिळतो. सध्या अमिताभ बच्चन यांचा एक ३७ वर्षांपूर्वीचा जूना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रितेश देशमुखनेही हा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

३७ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन हे 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला होता. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते घरी परतले होते. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. 'कुली'च्या एका सीनमध्ये त्यांना जबर मार लागला होता. त्यावेळी त्यांना रुग्नालयात दाखल करण्यात आले होते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -मुंबई पोलिसांनी खास अंदाजात केलं अमिताभ बच्चन यांचं अभिनंदन, पाहा ट्विट

बिग बींसाठी हा काळ खूप कठीण होता. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत होते. जवळपास दोन महिन्यांनी अमिताभ बच्चन जेव्हा त्यांच्या घरी परतण्यासाठी निघाले तेव्हाचा हा व्हिडिओ दुरदर्शनवर दाखवण्यात आला होता. स्वत: अमिताभ बच्चन यांनीही यामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांची आजही लोकप्रियता कायम आहेत. त्यावेळी त्यांनी बोलून दाखवलेला विश्वास त्यांनी पूर्ण केला आहे. ३७ वर्षानंतरही त्याच्या अभिनयाची क्रेझ पाहायला मिळते. अलिकडेच त्यांची 'दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचा हा जुना व्हिडिओ तेव्हाच्या बऱ्याच आठवणी ताज्या करतो.

हेही वाचा -दादासाहेब फाळके पुरस्कार: सचिन तेंडुलकरसह अनेकांचा अमिताभवर शुभेच्छांचा वर्षाव

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.