ETV Bharat / sitara

पियुष गोयल यांच्या 'त्या' टीकेवर रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर

मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी विलासराव हॉटेलच्या बाहेर एका दिग्दर्शकाला घेऊन गेले होते. आपल्या मुलाला चित्रपटात काम मिळावे, म्हणून त्यांची धडपड सुरू होती, असे पियुष गोयल यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते.

पियुष गोयल यांच्या 'त्या' टीकेवर रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर
author img

By

Published : May 14, 2019, 9:47 AM IST

Updated : May 14, 2019, 10:31 AM IST

मुंबई - केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या टीकेनंतर रितेश देशमुखने सोशल मीडियाद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. विलासरावांनी रितेश देशमुखला सिनेसृष्टीत काम मिळावे म्हणून एका दिग्दर्शकाची ताज हॉटेलमध्ये भेट घेतली होती. २६/११ च्या हल्ल्यादरम्यान ते त्या दिग्दर्शकाला घेऊन ताजमध्ये गेले होते, अशी टीका पियुष गोयल यांनी केली होती.

मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी विलासराव हॉटेलच्या बाहेर एका दिग्दर्शकाला घेऊन गेले होते. आपल्या मुलाला चित्रपटात काम मिळावे, म्हणून त्यांची धडपड सुरू होती, असे पियुष गोयल यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते.

Riteish Deshmukh answered to piyush Goyal
रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर

रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या टीकेचे खंडन केले आहे. त्याने ट्विटरवर एका पत्राद्वारे पियुष गोयल यांना उत्तर दिले आहे. 'माझ्या वडिलांनी मला काम मिळावे म्हणून कधीच कोणत्याही दिग्दर्शकाची किंवा निर्मात्याची भेट घेतली नाही. याचा मला अभिमानही आहे. जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, त्या व्यक्तीवर आरोप करणे चुकीचे आहे. सात वर्षांपूर्वी त्यांनी याचे उत्तर नक्की दिले असते'. अशाप्रकारे रितेशने उत्तर दिले आहे.

Intro:Body:

ent news

Conclusion:
Last Updated : May 14, 2019, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.