मुंबई - बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांची आज जयंती आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातील फोटो शेअर करून त्यांनी राज यांची आठवण शेअर केली आहे.
'मेरा नाम जोकर' याच चित्रपटातून ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये त्यांनी राज यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. १९७० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाशी जुळलेल्या त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत.
-
Happy Birthday dad! We shall always remember you.......love! pic.twitter.com/mT38hpxTma
— Rishi Kapoor (@chintskap) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy Birthday dad! We shall always remember you.......love! pic.twitter.com/mT38hpxTma
— Rishi Kapoor (@chintskap) December 14, 2019Happy Birthday dad! We shall always remember you.......love! pic.twitter.com/mT38hpxTma
— Rishi Kapoor (@chintskap) December 14, 2019
ऋषी कपूर हे काही महिन्यांपूर्वीच भारतात परतले आहेत. त्यांच्यावर न्यूयॉर्क येथे उपचार सुरू होते. या काळातही ते सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी लगेच पुन्हा आपले काम सुरू केले आहे. १३ डिसेंबरलाच त्यांची भूमिका असलेला 'द बॉडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेता इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे.