जगातील बहुतांश चित्रपटांत प्रेम हा केंद्रीय विषय असतो. आपले हिंदी चित्रपट तर प्रेमाशिवाय बनूच शकत नाहीत. एका चित्रपटातील ‘इलू इलू..’ खूप प्रसिद्ध झाले होते आणि हल्लीची तरुणाई ‘आय लव्ह यु’ साठी इंग्रजीतील ‘ वन फोर थ्री’ अक्षर-आकडे वापरताना दिसतात. प्रेम ही जगातील एक सुंदर भावना आहे. आजवर जगात बऱ्याच प्रेमकथा अजरामर ठरल्या आहेत. आणि अशा बऱ्याचश्या प्रेमकथांचे रूपांतर चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता आले. विशेष म्हणजे सध्या अशाच रोमँटिक चित्रपटांची चलती आहे आणि सध्याचा प्रेक्षक वर्गही अशा प्रेमबद्ध कथांना विशेष पसंती दर्शवित आहे.
अशाच प्रकारचा विषय घेऊन येत आहेत 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' आणि विरकुमार शहा आपल्या 'वन फोर थ्री' या नवीन चित्रपटातून. हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रदर्शनाच्या वाटेवर आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमावलींचे शिस्तबद्ध पालन करून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते आणि नुकतेच या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाले आहे. नाशिक, त्रिंबक, इगतपुरी, जखोरी गांव, गोटी गाव येथे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' आणि विरकुमार शहा निर्मित वन फोर थ्री' चे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले करीत असून त्यातून ते प्रेमाची परिभाषा मांडणार आहेत. अभिनेता वृषभ शहा यांची नकारात्मक भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे शिवाय शीतलचीही धमाकेदार एन्ट्री येथे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे संगीत संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे.
प्रेमाची अनोखी परिभाषा आणि प्रेमाचे लव्हेबल फंडे लवकरच 'वन फोर थ्री' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना लवकरच अनुभवयास मिळतील.
हेही वाचा - कोरोना मुक्त लव्हबर्ड्स रणबीर आणि आलिया मालदिवला रवाना