मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा वधूचा पोषाख परिधान करुन सज्ज झाली आहे. मात्र तिचा नवरा कोण हे अद्याप ठरलेले नाही. ती आपल्या पेंडींग नवऱ्याची प्रतीक्षा करताना दिसली. सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून याबद्दल तिने लिहिलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात परिणीती क्वारंटाईनमध्ये राहत आहे. दरम्यान एका लग्नाच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचे वधूच्या पोशाखातील फोटो प्रसिध्द झाले आहेत. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय, "वधू म्हणून सज्ज. नवरा प्रलंबित. @Khushmag तो कधी येईल याबद्दल काही माहिती ?"
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
परिणीतीने शेअर केलेले सर्व फोटो अप्रतिम सुंदर आहेत. अनेक चाहत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">