ETV Bharat / sitara

Jadeja Jhukega Nahi : अल्लू अर्जुनच्या ‘‘मै झुकेगा नही” स्टाईलची रविंद्र जडेजालाही भुरळ -

‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटात 'मै झुकेगा नहीं' म्हणत जेव्हा अल्लू अर्जुन दाढीखालून हात फिरवतो ती स्टाईल आता अनेकांनी जवळ केली आहे. अल्लू अर्जुनच्या याच स्टाइलची रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सुद्धा कॉपी केली आहे.

‘‘मै झुकेगा नही” स्टाईलची रविंद्र जडेजालाही भुरळ

author img

By

Published : Feb 25, 2022, 1:11 PM IST

साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने देशात आणि विदेशातील सेलेब्रिटींनाही वेड लावले आहे. या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर असंख्य रिल्स जगभर तयार होत आहेत. या चित्रपटात मै झुकेगा नहीं म्हणत जेव्हा अल्लू अर्जुन दाढीखालून हात फिरवतो ती स्टाईल आता अनेकांनी जवळ केली आहे. अल्लू अर्जुनच्या याच स्टाइलची रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सुद्धा कॉपी केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात विकेट मिलाल्यानंतर जडेजाने याच झुकेगा नहीं फिल्मी स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, अशा प्रकारची प्रतिक्रिया आपण सर्वांनीच कुठेतरी पाहिली असेल.

गुरुवारी भारत आणि श्रीलंका यांच्या खेळल्या गेलेल्या तीन टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजयी कामगिरी केली. भारतीय संघाने हा सामना 62 धावांनी जिंकला. या सामन्यात 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला केवळ 137 धावा करता आल्या.

हेही वाचा - अटकेनंतर ट्विटरवर नवाब मलिकांचा 'पुष्पा' डायलॉग 'मैं झुकेगा नहीं' चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.