ETV Bharat / sitara

रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, 'दीपवीर'ची रॅपअप पार्टित धमाल - ranveer deepika dance in wrapup party

दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीत चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान देखील आपल्या पत्नीसोबत मिनी माथुर देखील होते.

रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, 'दीपवीर'ची रॅपअप पार्टित धमाल
author img

By

Published : Oct 8, 2019, 12:54 PM IST

मुंबई - अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी '८३' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार पुन्हा एकदा या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर, दीपिका पदुकोण ही लग्नानंतर पहिल्यांदाच त्याच्यासोबत ऑनस्क्रिन पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटाच्या रॅपअप पार्टित दीपवीरने धमाल डान्स केला.

यावेळी दीपवीरने क्रिकेट खेळण्याची देखील ऍक्टिंग केली आहे. दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीत चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान देखील आपल्या पत्नीसोबत मिनी माथुर देखील होते.

हेही वाचा -...म्हणून रणवीरवर रागावली धोनीची मुलगी, धोनीने उलगडला किस्सा

दीपिका आणि रणवीर दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. दोघांचीही जोडी चाहत्यांमध्येही लोकप्रिय आहे. '८३' चित्रपटात दीपिकाची भूमिका अगदी लहान असणार आहे. पुढच्या वर्षी १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -आयुष्मान खुराना, रणवीर सिंगवर अक्षयच्या 'बाला'ची क्रेझ, पाहा व्हिडिओ

चित्रपटाच्या रॅपअप पार्टित साहिल खट्टर, ताहिर राज भसीन, साकिब सलीम, एमी विर्क, हार्डी संधू आणि इतरही कलाकारांनी हजेरी लावली होती.

Intro:Body:

Bollywood

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.