मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये रणवीर सिंग गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. रणवीरने एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
दिव्यांग ठक्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, मनिष शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. स्त्री- पुरूष समानता या विषयावर आधारित हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -खऱ्या आयुष्यात विकीला 'या' गोष्टींची वाटते भीती, पाहा 'भूत'चा मेकिंग व्हिडिओ
रणवीरसोबत या चित्रपटात 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेत्री शालिनी पांडेचीही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
रणवीर सध्या त्याच्या '८३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
हेही वाचा -रोहित शेट्टी बनवणार 'चेन्नई एक्सप्रेस २', 'ही' जोडी साकारणार भूमिका?