ETV Bharat / sitara

वाढदिवशी रणवीर सिंगची चाहत्यांना खास भेट, पाहा कपिल देव यांच्या रुपातला फर्स्ट लूक - kabir khan

१९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकावर बाजी मारली होती. हाच थरार पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रणवीरने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

वाढदिवशी रणवीर सिंगची चाहत्यांना खास भेट, पाहा कपिल देव यांच्या रुपातला फर्स्ट लूक
author img

By

Published : Jul 6, 2019, 8:06 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो 'हरियाणा हरिक्केन' म्हणून ओळखले जाणारे कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित हा चित्रपट आहे. आज (६ जुलै) रणवीरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रणवीरने कपिल देव यांच्या रुपातला फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या वाढदिवसाचे हे चाहत्यांना खास गिफ्टच म्हणता येईल.

१९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने विश्वकरंडकावर बाजी मारली होती. हाच थरार पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रणवीरने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे. कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी त्याने त्यांच्या घरी दिल्ली येथे १० दिवस राहून प्रशिक्षण घेतले.

या चित्रपटात रणवीरसोबत दीपिका पदुकोण देखील झळकणार आहे. कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका ती साकारणार आहे. त्यामुळे रिअल लाईफमधील पती पत्नीची जोडी ऑनस्क्रिन देखील पती पत्नीच्या रुपात दिसणार आहे.

दिग्दर्शक कबिर खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.