मुंबई - अभिनेता रणवीर सिंगने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ झलक शेअर केली आहे. रॅपर 'काम भारी' याच्या नव्या 'गणपति आ गया रे' या गाण्याचा हा व्हिडिओ आहे. मराठी भाषेत असणारा हा व्हिडिओ गणपतीच्या आगमनाने सर्वत्र कसा आनंद पसरलाय याचे वर्णन यात पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जंगल वाचवण्याची मोहिम एका बाजूला सुरू असताना मुंबई लगत असलेले आरेचे जंगल मेट्रो शेडसाठी कापण्यात येणार आहे. याच आरे परिसरात हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय. यात 'काम भारी' गणपती बप्पाची मूर्ती बनवताना दिसत आहे. श्रीगणेशाच्या आगमनाने निसर्ग वाचवण्यासाठी बळ मिळेल, अशी एकंदरीत धारणा गाण्यात दिसते.
रणवीर सिंगने या व्हिडिओची लिंक आपल्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईल बायोमध्ये दिली आहे. त्यावर क्लिक केल्यावर हा व्हिडिओ पाहायला मिळतो. सध्या रणवीर सिंग आगामी '८३' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये गुंतला आहे.