मुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात सुप्रसिद्ध झालेल्या राणू मंडलच्या आवाजाने सर्वांना भूरळ पाडली आहे. हिमेश रेशमियाच्या 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटातलं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं राणूच्या आवाजात रेकॉर्ड केल्यानंतर आता पुन्हा एकदा हिमेशच्या एका गाजलेल्या गाण्याला राणूच्या आवाजाचा हटके तडका मिळणार आहे.
राणूचा रेल्वे स्टेशन ते हिमेश रेशमियाचा स्टुडिओपर्यंतचा प्रवास कोणालाही थक्क करणारा असा आहे. 'सपने देखो सपने पूरे होते ही है', या वाक्याप्रमाणेच राणूचे नशीब पालटले आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त राणू मंडल हेच नाव चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
आता हिमेशचं '३६ चायना टाऊन' या चित्रपटातंल गाजलेलं गाणं 'आशिकी मे तेरी' या गाण्यालाही राणूच्या आवाजाचा स्वरसाज मिळाला आहे. लवकरच हे गाणं देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'तेरी मेरी कहानी' व्हिडिओप्रमाणेच राणूच्या या व्हिडिओलादेखील भरभरुन लाईक्स आणि व्हिव्ज मिळाले आहेत.