ETV Bharat / sitara

राणी मुखर्जीचा 'मर्दानी' लूक पाहिला का?

मर्दानी या चित्रपटात राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा शोध घेणाऱ्या या शिवानीच्या प्रेक्षक प्रेमात पडले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

राणी मुखर्जीचा 'मर्दानी' रूप पाहिला का?
author img

By

Published : Apr 30, 2019, 12:00 PM IST

Updated : Apr 30, 2019, 12:15 PM IST

मुंबई - 'मर्दानी' या चित्रपटातून बिनधास्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी राणी मुखर्जी पुन्हा एकदा मर्दानीच्या रूपात दिसणार आहे. तिचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 'मर्दानी'च्या सिक्वेलमध्येही ती पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rani Mukharjee
राणी मुखर्जी

मर्दानी या चित्रपटात राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा शोध घेणाऱ्या या शिवानीच्या प्रेक्षक प्रेमात पडले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'मर्दानी २' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील राणीचा लूक कसा असणार, याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती.

दिग्दर्शक गोपी पुथरन हे 'मर्दानी २' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. गोपी यांनीच 'मर्दानी'ची पटकथा लिहिली होती. राणीचा पती आदित्य चोप्रा या सिक्वेलचा निर्माता असणार आहे. राणीने काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून २०१९ च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 30, 2019, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.