ETV Bharat / sitara

राखी सावंतची पंतप्रधानांना विनंती.. वेबसीरिजसाठी स्वतंत्र सेन्सॉर बनवा व त्याची मला सदस्य करा - Ramdas Athavale

राखी सावंतला सेन्सॉर बोर्डावर सदस्य होऊन वेब सिरीजमधील अश्लिलता रोखायची आहे. यासाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्याची मागणी तिने पंतप्रधानांना केली आहे.

राखी सावंत
author img

By

Published : Jun 28, 2019, 10:49 PM IST

Updated : Jun 28, 2019, 11:01 PM IST

इंदूर - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंतने सेन्सॉर बोर्डाचे सदस्य व्हायचे ठाम ठरवले आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंदूरमध्ये आलेल्या राखीने ही गोष्ट सांगितली. वेब सिरीजसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असले पाहिजे असे तिचे म्हणणे आहे.

राखी म्हणते की, यूट्यूबवर वेब सिरीजमध्ये फार अश्लिलता पसरली आहे. यावर रोख लावण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापण्याची गरज आहे. या बोर्डावर राखीला सदस्य व्हायचे असल्याची मागणी तिने पंतप्रधानांना केली आहे.

राखीने आरपीआईचे रामदास आठवले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना विनंती केली आहे की, या सेन्सॉर बोर्डावर तिची नियुक्ती करावी. यातून अश्लिलता रोखणे सोपे होईल असेही तिने म्हटलंय. राखी सावंत लवकरच 'धारा 370' या चित्रपटात झळकणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 28, 2019, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.