चेन्नई - नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला गेलेले सुपरस्टार रजनीकांत पूर्ण उपचार घेऊन शुक्रवारी चेन्नईत दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी चेन्नई विमानतळावर मोठी गर्दी केली होती. त्यासंबंधीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला गेलेले सुपरस्टार रजनीकांत शुक्रवारी सकाळी चेन्नईत दाखल झाले. असे संपूर्ण उपचारानंतर ते अमेरिकेतून चेन्नईला परतले आहेत. रजनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी चेन्नई विमानतळावर मोठी गर्दी केली होती. चाहत्यांच्या गर्दीच्या रांगेचे फोटो व्हायरल झाले आहेत.
आरोग्य तपासणीसाठी वर्षातून दोनदा अमेरिकेत जाणारे रजनीकांत वर्षभरात कोरोनाच्या परिस्थितीमुळे अमेरिकेत उपचारासाठी जाऊ शकले नव्हते. तथापि, देशातील कोविड साथीच्या आजारात नुकत्याच झालेल्या घटीनंतर रजनीकांत यांनी केंद्राकडून अमेरिकेच्या प्रवासासाठी परवानगी मागितली होती. सरकारकडून परवानगी मिळताच रजनीकांत आणि त्यांचे कुटुंब अमेरिकेत निघून गेले होते.
कामाच्या पातळीवर थलैवा रजनीकांत यांच्या 'अण्णात्थे' या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. कोरोना साथीमुळे हे शुटिंग लांबणीवर पडले आहे. या चित्रपटाचा बहुतांश भाग शूट झाला असून याचा क्लायमॅक्स रामोजी फिल्मसिटीमध्ये सुरू असताना क्रूमधील काहीजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रजनीकांतही रुग्णालयात दाखल झाले व हे शुटिंग थांबवण्यात आले. पुढील महिन्यात या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात खुशबू, मीना, जगपतिबाबू आणि कीर्ति सुरेश मुख्य भूमिका साकारत आहेत.
हेही वाचा - 'पिंग पॉंग'ची पहिली वेब सिरीज ‘हिडन’चे ट्रेलर झाले लाँच!