मुंबई - दाक्षिणात्य सिनेस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या '२.०' या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच हा चित्रपट चीनमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. मात्र, भारतीय चित्रपटांना चांगला प्रतिसाद देणाऱ्या चिनी प्रेक्षकांनी '२.०' चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.
६ सप्टेंबरला चीनच्या चित्रपटगृहात '२.०' झळकला. मात्र, आठवड्याच्या शेवटपर्यंत या चित्रपटाने फक्त २२ कोटी इतकीच कमाई केली आहे. त्यामुळे चीनी प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा -सुशांत सिंग राजपूतच्या ५० स्वप्नांची यादी पाहून रेहा चक्रवर्तीने दिली 'ही' प्रतिक्रिया
यापूर्वीही 'बाहूबली २' चित्रपटाला चीनमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. या चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिसवर अवघ्या ५२ कोटीचा गल्ला जमवला होता.
याउलट, बॉलिवूडचे 'बजरंगी भाईजान', 'दंगल', 'अंधाधून', 'सिक्रेट सुपरस्टार', 'हिचकी', 'इंग्लिश मीडियम', 'मॉम', यांसारख्या चित्रपटाला चीनी प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा -मालदीवच्या समुद्रकिनारी सुष्मिता सेनचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला व्हिडिओ
यावरुन चीनी प्रेक्षकांना व्हिएफएक्स ग्राफिक्स असलेल्या चित्रपटांपेक्षा कौटुंबिक आणि भावनिक असलेले चित्रपट आवडतात, याचा अंदाज येतो.