मुंबई - दाक्षिणात्य सिनेस्टार रजनीकांत यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांच्या फक्त नावावर आजवर बरेच चित्रपट सुपरडुपरहिट झालेले आहेत. आज त्यांचा ७० वा वाढदिवस आहे. दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये त्यांची फक्त अभिनेत्याचीच नाही, तर देवाची प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्यांनी दाक्षिणात्यच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या अॅक्शनची भूरळ बॉलिवूड कलाकारांवरही पाहायला मिळते.
रजनीकांत आज लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. गरीबीतून त्यांनी भरारी घेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० साली बंगळुरू येथे झाला होता. त्यांच्या आईचे नाव रमाबाई आणि वडिलांचे नाव रामोजीराव असे आहे. त्यांचे वडील बंगळुरूच्या पोलीसदलात कार्यरत होते.
रजनीकांत जेव्हा ४ वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई त्यांना सोडून गेली होती. त्यांना चार बहिण भाऊ होते. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे बालपणीच त्यांच्यावर जबाबदारीचे ओझे येऊन पडले.
कुली पासून तर कारपेंटरपर्यंतची सर्व कामे त्यांनी केली. बस कंडक्टरचीही त्यांनी नोकरी केली. त्यांना अवघे ७५० रुपये तेव्हा मिळायचे. तेव्हा त्यांना चित्रपटांचे प्रचंड वेड होते. जेव्हा ते बस कंडक्टरची नोकरी करत असत, तेव्हा कन्नडा रंगमचावर ते भूमिका देखील साकारत असत. त्यानंतर ते १९७३ साली मद्रास फिल्म इंन्स्टिट्यूटशी जोडले गेले.
हेही वाचा -B'day Spl: रजनीकांत यांचा ७० वा वाढदिवस, वाचा त्यांच्यावर तयार करण्यात आलेले भन्नाट विनोद
वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. 'अपूर्वा रागांगल' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. मात्र, यामध्ये ते मुख्य भूमिकेत नव्हते. यामध्ये त्यांनी कमल हासन यांच्यासोबत भूमिका साकारली होती. त्यांनंतर १९७८ साली त्यांनी तमिळ चित्रपट 'भैरवी'मध्ये भूमिका साकारली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटानंतर त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'भैरवी'नंतर त्यांचे एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट झाले होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचे नायक म्हणून ते लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंधा कानून' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला होता.
रजनीकांत यांच्या लग्नाचीही कहानी अतिशय रंजक आहे. त्यांनी लता रंगाचारी यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्या रजनीकांत यांच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान आहेत. जेव्हा लता एका मॅगझिनसाठी रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांची ओळख झाली होती. १९८१ साली त्यांचा विवाह पार पडला होता. त्यांना ऐश्वर्या आणि सौदर्या या दोन मुली देखील आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रजनीकांत हे जॅकी चन यांच्यानंतर आशियाचे सर्वात महागडे अभिनेते ठरले आहेत. अलिकडेच त्यांना 'ईफ्फी' पुरस्कार सोहळ्यात लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा -'चुलबुल पांडे' विरुद्ध 'बाली सिंग', 'दबंग ३' मध्ये होणार तगडी टक्कर