मुंबई - आतंरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. गोव्यात हा सोहळा रंगणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने हा सोहळा अधिक रंगतदार होणार आहे. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे या सोहळ्याची एकत्र सुरुवात करतील. दोघांनी २०१४ साली एका कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतर आता 'ईफ्फी'च्या निमित्ताने दोघेही या सोहळ्यात आपली विशेष उपस्थिती दर्शवणार आहेत.
रजनीकांत यांना या सोहळ्यात 'आयकॉन ऑफ गोल्डन जुबली' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर, अमिताभ बच्चन यांना देखील विशेष ट्रिब्यूट दिले जाणार आहे. त्यांच्या काही चित्रपटांच या सोहळ्यात स्क्रिनिंगही होणार आहे. यामध्ये 'शोले', 'पीकू', 'ब्लॅक', 'बदला', आणि 'पा' या चित्रपटांचा समावेश आहे.
-
The two stalwarts - #Rajinikanth and #AmitabhBachchan - will attend the opening ceremony of the 50th edition of #IFFIGoa on 20 Nov 2019... Shankar Mahadevan to enthrall audiences with fusion music at the opening. @PrakashJavdekar @Chatty111Prasad @esg_goa #IFFI2019 #IFFI50
— taran adarsh (@taran_adarsh) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The two stalwarts - #Rajinikanth and #AmitabhBachchan - will attend the opening ceremony of the 50th edition of #IFFIGoa on 20 Nov 2019... Shankar Mahadevan to enthrall audiences with fusion music at the opening. @PrakashJavdekar @Chatty111Prasad @esg_goa #IFFI2019 #IFFI50
— taran adarsh (@taran_adarsh) November 4, 2019The two stalwarts - #Rajinikanth and #AmitabhBachchan - will attend the opening ceremony of the 50th edition of #IFFIGoa on 20 Nov 2019... Shankar Mahadevan to enthrall audiences with fusion music at the opening. @PrakashJavdekar @Chatty111Prasad @esg_goa #IFFI2019 #IFFI50
— taran adarsh (@taran_adarsh) November 4, 2019
हेही वाचा -वसईकर वीणाची गरूड भरारी... माॅरीशसमध्ये मिसेस इंडीया युनिव्हर्स २०१९ चा पटकावला किताब
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्याही गायनाचा स्वरसाजही कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केला आहे.
IFFI चा हा सोहळा गोव्यात २० ते २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा -IFFI 2019: रजनीकांत ठरले 'ऑयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबली' पुरस्काराचे मानकरी