हैदराबाद - रजनीकांत यांच्या प्रकृतीसंदर्भात हैदराबादच्या अपोलो रुग्णालयांद्वारे हेल्थ बुलेटिन प्रसिद्ध केले. ब्लड प्रेशरच्या चढ-उतारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘अण्णात्थे’ या चित्रपटाच्या शूटसाठी रजनीकांत गेली १० दिवस हैदराबादला आले होते. या चित्रपटाच्या काही क्रू मेंबर्सची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शुटिंग थांबवण्यात आले आहे.
अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, "रजनीकांत यांचा रक्तदाब कालच्या तुलनेत अजूनही उत्तम नियंत्रणाखाली आहे." त्यांच्या रक्तदाब नियंत्रणाच्या आधारे नुकत्याच झालेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये डॉक्टर म्हणाले म्हणाले की, ''त्यांना डिस्चार्ज देण्याबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेण्यात येईल.''
शुटिंग क्रूला झाली होती कोरोनाची बाधा
"घोषणा: 'अण्णात्थे' शूटच्या रूटीन टेस्टिंग दरम्यान ४ क्रू मेंबर्सनी कोविड १९ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि इतर क्रू मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आली आहे. अण्णात्थे शुटिंग पुढे ढकलण्यात आले आहे,'' असे ट्विट सन पिक्चर्सने दोन दिवसापूर्वी केले आहे.
'अण्णात्थे' चित्रपटाचे सुरू होते शुटिंग
'अण्णात्थे' हा तमिळ अॅक्शन चित्रपट आहे. चित्रपट शिव यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला असून कलानिथी मारन निर्मित सन पिक्चर्स या बॅनरखाली बनवला आहे. या चित्रपटात रजनीकांत, मीना, खुशबू, कीर्ती सुरेश, नयनथारा, प्रकाश राज आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह मुख्य भूमिकेत आहेत.मे २०२० रोजी सन पिक्चर्सने घोषित केले होते ती अण्णात्थे पोंगल सणाच्यावेळी (संक्रांत) रिलीज होणार आहे. तथापि, कोविड उद्रेकानंतरच्या विलंबामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.
हेही वाचा - भन्साळी, आलिया भट्ट यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ कायदेशीर अडचणीत