मुंबई - हल्ली अनेक कलाकार आपल्या भूमिकांसाठी योग्य शरीरयष्टीसाठी बनविण्यास प्राधान्य देताना दिसताहेत. ‘युअर ऑनर’ या वेब सिरीज मधून नावारूपास आलेला अभिनेता पुल्कित माकोल दुसऱ्या भागातही दिसेल. यावेळी त्याची भूमिका अजूनही खतरनाक असून भूमिकेला योग्य अशी शरीरयष्टीसाठी गोव्यात तीन महिने कल्लरिपयट्टूचे प्रशिक्षण घेण्यासाठी तीन महिने मुक्काम केला आहे.
गोव्यात घेतले कल्लरिपयूट्टूचे प्रशिक्षण
पुल्कित मकोलने त्याच्या भूमिकेमध्ये सामावून जाण्यासाठी भारताचा प्राचीन मार्शन आर्ट कल्लरिपयूट्टूचे प्रशिक्षण घेतले. त्याच्या भूमिकेच्या बदलत्या रचनेसह मानसिकता व देहबोली देखील त्यामधून दिसून येण्याची गरज होती. भूमिका योग्य असण्यासाठी सिरीजच्या निर्मात्यांनी पुल्कितला कल्लरिपयट्टूचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. निश्चितच, पहिल्या सीझनपासून दुस-या सीझनपर्यंत अबीरमधील परिवर्तन अत्यंत रोचक आणि 'युअर ऑनर २'मध्ये बघण्यासारखे आहे. ''शूटिंगच्या चार महिन्यांपूर्वी मला कल्लरिपयट्टूचे प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्याला पाठवण्यात आले. तेथे मी ३ महिने मार्शल आर्टिस्ट म्हणून प्रशिक्षण घेतले. रोचक बाब म्हणजे विविध प्राण्यांच्या हालचाली आणि माझ्या शरीररचनेचे विविध भाग समजले. ज्यामुळे मला अबीर या माझ्या भूमिकेमधील प्राण्याचे गुण दाखवण्यास मदत झाली. यामधून मला योद्धाची मानसिकता मिळाली, मला शिस्तबद्धता व हार न मानण्याची वृत्ती समजली, जे या सीझनमध्ये अबीरची भूमिका साकारण्यासाठी आवश्यक होते.''
हेही वाचा - पाहा, उत्तेजक ड्रेस परिधान करुन कंगनाने दिले FIR ला उत्तर