ETV Bharat / sitara

'द स्काय ईझ पिंक'चा वर्ल्ड प्रिमिअर, प्रियांकाने शेअर केली भावनिक पोस्ट - farhan akhtar role in sky is pink

'द स्काय ईझ पिंक' चित्रपटाची टोरान्टो फिल्म फेस्ट्विलमध्ये स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या चित्रपटाची संपूर्ण टीम टोरान्टो येथे रवाना झाली होती.

'द स्काय ईझ पिंक'चा वर्ल्ड प्रिमिअर, प्रियांकाने शेअर केली भावनिक पोस्ट
author img

By

Published : Sep 15, 2019, 4:47 PM IST

मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा ही लवकरच 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्राला पुन्हा एकदा बॉलिवूडच्या चित्रपटात पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय सुखद होता, असे लिहित प्रियांकाने चित्रपटाच्या टीमसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

'द स्काय ईझ पिंक' चित्रपटाची टोरान्टो फिल्म फेस्ट्विलमध्ये स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या चित्रपटाची संपूर्ण टीम टोरान्टो येथे रवाना झाली होती. प्रियांकाने चित्रपटाच्या टीमसोबतचे काही फोटो शेअर करुन चित्रपटाच्या दिग्दर्शिका शोनाली बोस यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा-या खास व्यक्तीनं केलं अभिनयाचं कौतुक, नवाजचा आनंद गगनात मावेना

हा चित्रपट प्रेरणादायी वक्ता असलेल्या आयशा चौधरी यांच्यावर आधारित आहे. त्यांच्या आई - वडिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

झायरा वसिम ही या चित्रपटात आयशा चौधरी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर दोघेही तिच्या आई - वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ११ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा-अविस्मरणीय अनुभव, 'स्काय इज पिंक'साठी प्रियांकाची भावनिक पोस्ट

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.