ETV Bharat / sitara

‘आटपाडी नाईट्स’ : पाहा, सायली आणि प्रणवच्या ‘प्रेमाचा झांगडगुत्ता’

‘आटपाडी नाईट्स’ चित्रपटातील प्रणव रावराणे आणि सायली संजीव यांच्यावर चित्रीत झालेले ‘प्रेमाचा झांगडगुत्ता’ हे गाणे प्रेक्षकांचे आकर्षण ठरत आहे. उत्तम चाल, ठेक्यातील नाच, लक्ष वेधक कोरिओग्राफी आणि सायली-प्रणवची जुळून आलेली केमिस्ट्री यामुळे गाणे आकर्षक झाले आहे.

Aatpadi Nights
आटपाडी नाईट्स
author img

By

Published : Dec 14, 2019, 8:48 PM IST

‘आटपाडी नाईट्स’च्या वसंत बापूसाहेब खाटमोडेचा (प्रणव रावराणे) ‘रात्रीचा काहीतरी घोळ’ आहे याची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी वसंता आणि हरिप्रिया (सायली संजीव) यांच्यात जबरदस्त ‘झांगडगुत्ता’ जमून आल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाचा झांगडगुत्ता’ या गाण्यामधून दिसत आहे. चित्रपटाच्या टीजर पाठोपाठ सायली आणि प्रणवचा ‘झांगडगुत्ता’ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आहेत. प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांच्या ‘प्रिये’ या कवितेने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हेच नारायण पुरी मोबाईलच्या स्मॉल स्क्रीन नंतर आता थिएटरची बिग स्क्रीन गाजवायला तयार झाले आहेत. ‘आटपाडी नाईट्स’ या मराठी चित्रपटातून त्यांचे गीतकार म्हणून पदार्पण होत आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘प्रिये’ नंतर ‘प्रेमाचा झांगडगुत्ता ग, जीव झाला खलबत्ता ग, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग’ या ओळी तरुणाईला झिंगायला लावणार हे निश्चित.

‘प्रेमाचा झांगडगुत्ता’ या गीताला विजय गवंडे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायक आदर्श शिंदे आणि वैशाली माडे यांच्या खास शैलीतील गायकीमुळे या गाण्याला चार चाँद लागले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, या ठेका धरायला लावणाऱ्या गाण्याची लक्षवेधी कोरिओग्राफी राहुल ठोबरे आणि संजीव होवलदार यांनी केली आहे.

Aatpadi Nights
आटपाडी नाईट्स’

मायदेश मीडिया निर्मित 'आटपाडी नाईट्स' मध्ये प्रणव रावराणे, सायली संजीव, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतिन इनामदार, प्रशांत जाधव, शितल कलापुरे, चैत्राली रोडे, श्वेता परदेशी, बालकलाकार ओम ठाकूर, स्व. विवेक राजेश, डॉ. सुधीर निकम, अनुजा प्रभू केळुसकर आणि सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे कथानक असलेला ‘आटपाडी नाईट्स’ येत्या २७ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.