मुंबई: सेल्फ- आयसोलेशनमध्ये असलेल्या अभिनेत्री प्रीती झिंटाने बुधवारी आठवणींच्या जगातून फेरफटका मारला. "सोल्जरला कायमचे पहात आहे" असे सांगत तिने सिनेमाची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोमॅन्टिक अॅक्शन सिनेमा 'सोल्जर'चा एक फोटो तिने शेअर केलाय.
''सोल्जर सिनेमा आई आणि नवऱ्यासोबत पाहात आहे. कारण आजची रात्र हिंदी मुव्ही नाईट आहे. मी आईला नकार देऊ शकत नाही.'', असे प्रितीने लिहिलंय.
-
Watching “Soldier” after forever with mom & hubby 😘 Cuz Tuesday night is Hindi movie night ❤️ and I cannot say no to mom and Gene 🤩 Miss you #BobbyD #Day21 #quarantine #stayhome #staysafe #ting pic.twitter.com/AG3ZHL9bBg
— Preity G Zinta (@realpreityzinta) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Watching “Soldier” after forever with mom & hubby 😘 Cuz Tuesday night is Hindi movie night ❤️ and I cannot say no to mom and Gene 🤩 Miss you #BobbyD #Day21 #quarantine #stayhome #staysafe #ting pic.twitter.com/AG3ZHL9bBg
— Preity G Zinta (@realpreityzinta) April 1, 2020Watching “Soldier” after forever with mom & hubby 😘 Cuz Tuesday night is Hindi movie night ❤️ and I cannot say no to mom and Gene 🤩 Miss you #BobbyD #Day21 #quarantine #stayhome #staysafe #ting pic.twitter.com/AG3ZHL9bBg
— Preity G Zinta (@realpreityzinta) April 1, 2020
आपल्याला माहिती असेल की 'सोल्जर' हा प्रितीचा पहिला चित्रपट होता. १९८८ मध्ये अलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. या सिनेमात तिची जोडी बॉबी देओलसोबत होती. यानंतर तिची कारकिर्द बहरत गेली.
सेशल मीडियाचा चांगला उपयोग सध्या प्रिती करताना दिसत आहे. लोकांच्यात कोरोना व्हायरस विषयी जागृती करण्याचा ती प्रयत्न करताना दिसते.
आपल्या घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन तिने केले होते. या मुक्या जनावरांपासून कोरोना होत नसल्याचे सांगत त्यांना सांभालण्याचे आवाहन तिने केले आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार भारतात १२३८ कोरोना बाधीतांचा आकडा पोहोचला आहे. यात १३५ लोक बरे झाले असून ३५ लोक मृत्यूमुखी पडले आहेत.