ETV Bharat / sitara

शेती विकायची नसते.. राखायची असते; हा डायलॉग वडिलांमुळे सुचला - प्रविण तरडे - शेती

माझे वडील विठ्ठल तरडे. शेती विकायची नसते वो शेती राखायची असते.. हा डायलॉग मला ह्यांच्याकडे पाहून सुचला. शेतीचा एक तुकडा ही न विकता आज वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील शेती सांभाळतात. महाराष्ट्रातील अशा प्रत्येक शेतकऱ्याला सलाम, असं प्रविण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रविण तरडेंची फेसबुक पोस्ट
author img

By

Published : Jul 28, 2019, 1:47 PM IST

Updated : Jul 28, 2019, 3:01 PM IST

मुंबई - प्रविण तरडे यांचे दिग्दर्शन असलेला 'मुळशी पॅटर्न' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. मुळशी या गावातील वास्तवावर आधारित या चित्रपटाच्या कथेसोबत यातील डायलॉगनेही प्रेक्षकांची मने जिंकली. हे डायलॉग आपल्याला आपल्या वडिलांमुळे सुचले असल्याचं दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणतात.

प्रविण तरडे यांनी आपल्या फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांचे वडील शेतीत राबताना दिसत आहेत. फोटोत ते भात शेतीत काम करताना दिसत आहेत. याच फोटोला प्रविण यांनी खास कॅप्शनही दिलं आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी सलाम केला आहे.

माझे वडील विठ्ठल तरडे. शेती विकायची नसते वो शेती राखायची असते.. हा डायलॉग मला यांच्याकडे पाहून सुचला. शेतीचा एक तुकडा ही न विकता आज वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील शेती सांभाळतात. महाराष्ट्रातील अशा प्रत्येक शेतकऱ्याला सलाम, असं प्रविण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

दरम्यान मुळशी पॅटर्नला मिळालेल्या यशानंतर प्रविण तरडे आणखी एक मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. हा सिनेमा शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
Last Updated : Jul 28, 2019, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.