ETV Bharat / sitara

Maazi Baygo : संगीतकार 'प्रशांत नाकती'च्या 'माझी बायगो' या मराठी गाण्याने पार केले १०० मिलीयन व्ह्यूज - new marathi song

'नादखुळा म्युझिक' प्रस्तुत 'आपलीच हवा' गाणं देखिल प्रदर्शित झालं आहे. माझी बायगो या गाण्याचे गीत - संगीत प्रशांत नाकतीने केले असून गायिका सोनाली सोनावणे आणि गायक केवल वाळंजने गीत गायले आहे.

maazi baygo
माझी बायगो
author img

By

Published : Mar 15, 2022, 7:31 PM IST

मुंबई - संगीत विश्वात 'मिलीनीयर' म्हणून ओळख असणा-या संगीतकार 'प्रशांत नाकती'च्या 'माझी बायगो' या गाण्याने तब्बल १०० मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत या गाण्याची सर्वत्र चर्चा होत आहे. नुकतचं 'नादखुळा म्युझिक' प्रस्तुत 'आपलीच हवा' गाणं देखिल प्रदर्शित झालं आहे. माझी बायगो या गाण्याचे गीत - संगीत प्रशांत नाकतीने केले असून गायिका सोनाली सोनावणे आणि गायक केवल वाळंजने गीत गायले आहे. या लव्ह सॉंगमध्ये निक शिंदे आणि श्रद्धा पवार हे कलाकार आहेत.

संगीतकार 'प्रशांत नाकती' 'माझी बायगो' गाण्याच्या घवघवीत यशाविषयी सांगतो, "१०० मिलीयन हा आकडा खूप मोठा आहे. मराठीमध्ये हातावर मोजण्या इतकीच गाणी आहेत ज्यांना इतके व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यामागे माझ्यासोबत, गायक, कलाकार व संपूर्ण टीमची खूप मेहनत आहे. तसेच १०० मिलीयन होण्यामागे प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. की त्यांनी या गाण्याला भरभरून प्रेम दिलं. आणि १०० मिलीयन त्यांच्याशिवाय होणं शक्यचं नव्हतं. असचं भरभरून प्रेम प्रेक्षकांचं मिळो हीच सदिच्छा !"

पहिल्याच गाण्याने 100 मिलीयनचा टप्पा ओलांडला

पुढे तो सांगतो, "खूप आनंद वाटतो आहे की हे आमचं पहिलचं गाणं आहे ज्या गाण्याने एका वर्षात १०० मिलीयन व्ह्यूजचा आकडा पार केला. हे गाणं २०२१ चं नंबर वन गाणं होतं. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातील किंवा अल्बमधील गाण्यांमध्ये हे एकमेव गाणं आहे ज्या गाण्याला १०० मिलीयन मिळाले आहेत. तसेच सगळ्यात जास्त लाईकस् देखिल माझी बायगो गाण्याला आहेत.

हेही वाचा - संगीतकार 'प्रशांत नाकती'च्या 'माझी बायगो' या मराठी गाण्याने पार केले १०० मिलीयन व्ह्यूज!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.