ETV Bharat / sitara

दीपिका पदुकोण 'द्रौपदी' साकारणाऱ्या महाभारतमध्ये 'दुर्योधना'ची भूमिका प्रभासने नाकारली?

बाहुबली फेम प्रभासच्या वाट्याला महाभारत चित्रपटातील दुर्योधनाची भूमिका आलाी होती. मात्र, त्याने ही भूमिका नाकारली आहे. यात द्रौपदीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण झळकणार आहे.

Prabhas turns down role of Duryodhana
दुर्योधना'ची भूमिका प्रभासने नाकारली
author img

By

Published : Jun 23, 2020, 8:20 PM IST

मुंबई - द्रोपदीच्या दृष्टीकोनातून बनवण्यात येणाऱ्या महाभारत या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण सध्या या चित्रपटाच्या चर्चेमध्ये बाहुबली फेम प्रभासच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाभारत या चित्रपटासाठी प्रभासला दुर्योधनाचा रोल ऑफर करण्यात आला आहे. परंतू हा प्रस्ताव त्याने नाकारला आहे. या चित्रपटाची निर्मिती मधु मंटेना करत आहेत.

महाभारत द्रोपदीच्या नजरेतून दाखवण्यात येईल. याने पौराणिक कथेला एक वेगळ्या नजरेतून पाहाता येईल. चित्रा बॅनर्जी यांच्या 'द पॅलेस ऑफ इल्यूजन्स' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असेल. या चित्रपटात श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी ह्रतिक रोशनचा विचार केला जात आहे. यात प्रभासला महाभारतमधील विरोधी पक्षाचे पात्र साकारण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्याने याचा स्वीकार केला नाही. त्यामुळे आता ही महत्त्वाची भूमिका कोणाच्या वाट्याला येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाभारत हा चित्रपट पुढच्यावर्षी दिवाळीला रिलीज करण्याचा विचार होता. मात्र, कोरोना व्हायरसनंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे आणि शूटिंग बंदी मुळे याचे रिलीज पुढे ढकलले जाऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.