ETV Bharat / sitara

मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगं मजेतय’ पोहोचला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात! - ‘पोरगं मजेतय’ ची पुणे फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड

मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलसाठी (19th Pune International Film Festival )निवड झाली आहे. मराठी स्पर्धात्मक विभागात ‘पोरगं मजेतय’ 9Porang Majetay)या चित्रपटाची निवड झाली आहे. बाप लेकामधल्या तरल नात्याचा भावनिक प्रवास ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.

मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगं मजेतय’
मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगं मजेतय’
author img

By

Published : Nov 23, 2021, 3:04 PM IST

आशयघन मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावत असतात आणि बरेच चित्रपट पुरस्कारही पटकावत असतात. ’१९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (19th Pune International Film Festival) मराठी स्पर्धात्मक विभागात ‘पोरगं मजेतय’ 9Porang Majetay)या चित्रपटाची निवड झाली आहे. बाप लेकामधल्या तरल नात्याचा भावनिक प्रवास ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवड होणे हे नेहमीच प्रतिष्ठेचे मानले जाते, त्यामुळे ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची झालेली निवड ही आमच्या टीमसाठी आनंददायी गोष्ट असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने (Makrand Mane)सांगतात.

मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगं मजेतय’
मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगं मजेतय’

‘रिंगण’, ‘यंग्राड’, ‘कागर’ यासारखे उत्तम चित्रपट मकरंद माने यांनी दिग्दर्शित केले आहेत. कलात्मक तरीही व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांच्या फळीतलं आश्वासक नाव म्हणजे मकरंद माने. आजवर त्यांनी त्यांच्या दर्जेदार चित्रपटांतून आपले दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केले आहे. त्यामुळेच आगामी ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

या चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे.

‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची प्रस्तुती असलेला आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने यांची निर्मीती असलेला ‘पोरगं मजेतय’ लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ २ ते ९ डिसेंबर २०२१ दरम्यान रंगणार आहे ज्यात ‘पोरगं मजेतय’ ची निवड झाली आहे.

हेही वाचा - 'जय भीम'च्या दिग्दर्शकाने मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.