ETV Bharat / sitara

पूजा बेदीच्या मुलीने बदललं नाव, आलियाची झाली अलाया - पुजा बेदीच्या मुलीने बदललं नाव

अलायाची 'जवानी जानेमन' चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.

Pooja bedi Daughter Alaya changed her name
पूजा बेदीच्या मुलीने बदललं नाव, आलियाची झाली अलाया
author img

By

Published : Jan 18, 2020, 10:14 PM IST

मुंबई - अभिनेत्री पुजा बेदीची मुलगी अलाया फर्नीचरवाला ही सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. अलायाचे नाव यापूर्वी आलिया असे होते. मात्र, तिने हे नाव बदलून आता अलाया केले आहे. सोशल मीडियावरही तिच्या नावात बदल झालेला पाहायला मिळतो.

अलायाने नाव बदलण्याच्या मागचं कारण सांगितलं आहे. चित्रपटसृष्टीत आधीच आलिया भट्टचे नाव सुप्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिने स्थान मिळवले आहे. त्यामुळे याच नावाने सुरुवात करण्यापेक्षा नाव बदलून करिअरची सुरुवात करण्यासाठी नावात बदल केला असल्याचं तिने म्हटले आहे.

हेही वाचा -अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटातून किर्ती सुरेशची माघार, आता 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका

अलायाची 'जवानी जानेमन' चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तब्बुचीही यामध्ये भूमिका आहे. ट्रेलरमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.

अलायाच्या या चित्रपटाला आता प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -'हसिन दिलरुबा'च्या शूटिंगला सुरुवात, तापसी - विक्रांतने शेअर केला फोटो

Intro:Body:

पूजा बेदीच्या मुलीने बदललं नाव, आलियाची झाली अलाया

मुंबई - अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्नीचरवाला ही सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. अलायाचे नाव यापूर्वी आलिया असे होते. मात्र, तिने हे नाव बदलून आता अलाया केले आहे. सोशल मीडियावरही तिच्या नावात बदल झालेला पाहायला मिळतो.

अलायाने नाव बदलण्याच्या मागचं कारण सांगितलं आहे. चित्रपटसृष्टीत आधीच आलिया भट्टचे नाव सुप्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिने स्थान मिळवले आहे. त्यामुळे याच नावाने सुरुवात करण्यापेक्षा नाव बदलून करिअरची सुरुवात करण्यासाठी नावात बदल केला असल्याचं तिने म्हटले आहे.

अलायाची 'जवानी जानेमन' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तब्बुचीही यामध्ये भूमिका आहे. ट्रेलरमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.

अलायाच्या या चित्रपटाला आता प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.