मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगची मॅनेजर सौम्या सेमी हिने स्टुडिओमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सौम्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, आता ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे सौम्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सौम्या बऱ्याच दिवसांपासून नैराश्यामध्ये (डिप्रेशन) होती, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३ फेब्रुवारी २०२० रोजी घडली. ३ फेब्रुवारी रोजी मिका सिंगच्या स्टुडिओमध्ये सौम्याने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती होती.
हेही वाचा -गायक मिका सिंगच्या मॅनेजरची रेकॉर्डिंग स्टुडिओत आत्महत्या
कौटुंबिक कारणामुळे सौम्या तीव्र नैराश्यामध्ये गेली होती. मिका सिंगच्या स्टुडिओमध्ये ती पहिल्या मजल्यावर एकटीच राहत होती. सौम्याच्या मृत्यूनंतर तिचे पार्थिव पंजाब येथे तिच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आले होते.
मिका सिंगने या घटनेबाबत शोक व्यक्त करत सौम्याला आदरांजली वाहिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">