ETV Bharat / sitara

जात-पात आणि प्रतिष्ठे पलीकडची प्रेमाची भावना, 'पिरेम'च्या चित्रीकरणाला सुरूवात - marathi movie

प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा याला काही स्थान नसते.अशाच गोष्टींचा विचार करून ‘पिरेम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

'पिरेम'च्या चित्रीकरणाला सुरूवात
author img

By

Published : May 2, 2019, 3:01 PM IST

मुंबई - प्रेम ही एक वैश्विक भावना आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा याला काही स्थान नसते. प्रेमापुढे सामाजिक, आर्थिक पातळीसुद्धा विरून जातात. तसेच प्रेम म्हटलं की रुसवे-फुगवे आणि हलकी भांडणं सुद्धा ओघाने आलीच. मात्र, कधी कधी या लहानशा रुसव्या- फुगव्यांच रूपांतर ‘ब्रेक-अप’मध्ये सुद्धा होतं. अशाच गोष्टींचा विचार करून ‘पिरेम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद विश्वजित पाटील आणि रामभाऊ यांनी लिहिले आहेत. ‘पिरेम’ या नावावरून कल्पना आलीच असेल की कथा ग्रामीण भागातील आहे. ही कथा गावातील गरीब घरातील अत्यंत हुशार मुलाची आहे, जो गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे दहावीनंतर शहरातील कॉलेजमध्ये शिकायला जातो. तिथे त्याच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलतो. परंतु, तो एका विचित्र प्रसंगात गुरफटून जातो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात नक्की काय घडतं, याचं चित्रण दिग्दर्शक प्रदीप लायकर यांनी ‘पिरेम’ या चित्रपटातून केलं आहे.

या चित्रपटातून विश्वजीत पाटील आणि दिव्या सुभाष ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दोघांशिवाय मानिनी दुर्गे , विठ्ठल खलसे, सागर खुर्द यांसारखी कलाकार मंडळी या सिनेमात आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते संभाजीराव बाळासाहेब पाटील, तेलुगू टायटन्सचे प्रशिक्षक डॉ.रमेश भेन्दिगिरी, विठ्ठल पाटील सर, डॉ.अण्णासाहेब गावडे, आणि युवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

Intro:प्रेम ही एक वैश्विक भावना आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा याला काही स्थान नसते. प्रेमापुढे सामाजिक, आर्थिक पातळीसुद्धा विरून जातात. तसेच प्रेम म्हटलं की रुसवे-फुगवे, धूसफूस व हलकी भांडणं ही सुद्धा ओघाने आलीच. कधी कधी या लहानश्या रुसव्या- फुगव्यांच रूपांतर ‘ब्रेक-अप’ मध्ये सुद्धा होते. अशाच शक्य-अशक्यतांचा विचार करून ‘पिरेम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद विश्वजित पाटील आणि रामभाऊ यांनी लिहिले आहेत.

‘पिरेम’ ह्या नावावरून कल्पना आलीच असेल की कथा ग्रामीण भागातील आहे. ही कथा गावातील गरीब घरातील अत्यंत हुशार मुलाची आहे, जो गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे दहावीनंतर शहरातील कॉलेजात शिकायला जातो. तिथे त्याच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलतो. परंतु तो एका विचित्र प्रसंगात गुरफटून जातो.त्यानंतर त्याच्या आयुष्यात नक्की काय घडत याच चित्रण दिग्दर्शक प्रदीप लायकर यांनी ‘पिरेम’ या चित्रपटातून केलं आहे.
या चित्रपटातून विश्वजीत पाटील आणि दिव्या सुभाष ही एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दोघाशिवाय मानिनी दुर्गे , विठ्ठल खलसे, सागर खुर्द यांसारखी कलाकार मंडळी या सिनेमात आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त शिव छत्रपती पुरस्कार विजेते संभाजीराव बाळासाहेब पाटील, तेलगु टायटन्सचे प्रशिक्षक डॉ.रमेश भेन्दिगिरी, विठ्ठल पाटील सर, डॉ.अण्णासाहेब गावडे, आणि युवराज पाटील यांच्याहस्ते संपन्न झाला.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.