ETV Bharat / sitara

पवन कल्याण आणि राणा दग्गुबाती पहिल्यांदाच येणार एकत्र - टॉलीवूड सुपरस्टार पवन कल्याण

तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण आपल्या आगामी चित्रपटात बाहुबली फेम राणा दग्गुबातीसोबत एकत्र येणार आहे. अद्याप शीर्षक न ठरलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर के चंद्रा करणार आहेत.

Pawan Kalyan, Rana Daggubati
पवन कल्याण आणि राणा दग्गुबाती
author img

By

Published : Dec 21, 2020, 1:15 PM IST

हैदराबाद: टॉलीवूड सुपरस्टार पवन कल्याण आणि 'बाहुबली' फेम राणा दग्गुबाती पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या जोडीने चित्रपट निर्माते सागर के चंद्रा यांच्या चित्रपटात काम करण्याचे निश्चित केले असून याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.

राणा या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर करुन केली आहे. "एका महाकाव्याच्या प्रवासाला आजपासून सुरूवात होईल! आम्ही शक्तीशाली भल्लादेव राणा दग्गुबाती पॉवरस्टार पवन कल्याणसोबत आमच्या १२ व्या प्रॉडक्शनसाठी एकत्र येत असल्यामुळे त्यांचे स्वागत करतो.'', असे ट्विटरवर म्हटले आहे.

pawan kalyan teams up with rana
पवन कल्याण आणि राणा दग्गुबाती पहिल्यांदाच येणार एकत्र

अद्याप शीर्षक न ठरलेला हा चित्रपट मल्याळम हिट 'अयप्पाणम कोशियम'चा तेलुगू रिमेक असल्याचे म्हटले जाते. पृथ्वीराज सुकुमारन आणि बिजू मेनन यांनी मुळ चित्रपटात साकारलेल्या भूमिका राणा आणि पवन कल्याण साकारतील.

हेही वाचा - सोनू सूद बनला २०२०चा टॉप ग्लोबल आशियाई सेलिब्रिटी

पवन कल्याण अगामी 'वकिल साहब' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदीतील 'पिंक' या चित्रपटाचा तेलुगू रिमेक आहे. तर राणा 'हाथी साथ साथी'च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. संक्रांतीला हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा - तेलंगणामध्ये उभारले 'सोनू सूद'चे मंदिर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.