मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पती पत्नी और वो'चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. लखनौ येथे या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकने बरेचसे अपडेट चाहत्यांशी शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे फर्स्ट लूकही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. आता ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
'पती पत्नी और वो' या चित्रपटात कार्तिक आर्यन 'चिंटू त्यागी' नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या तर अनन्या पांडे त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दोघींचाही ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो. तर, कार्तिक आर्यनची सर्वसामान्य व्यक्तीच्या रुपातील झलक पाहायला मिळते.
हेही वाचा -अभिनेत्री पल्लवी पाटीलने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस
वडिलांच्या सांगण्यावरून शिक्षण ते नोकरी त्यानंतर लग्न असा प्रवास करणाऱ्या कार्तिकच्या आयुष्यात पत्नी आणि गर्लफ्रेंडमुळे काय काय किस्से घडतात, हे या ट्रेरलमध्ये पाहायला मिळते. अभिनेता अपारशक्ती खुराना देखील या चित्रपटात भूमिका साकारत आहे. कार्तिक आर्यनच्या मित्राची भूमिका तो साकारत आहे.
-
Ya toh Araam hi Araam hamari kismat mein nahi likha ya apne hi Pita ke haathon chu*** bane hain hum😬
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Miliye #ChintuTyagi se #PatiPatniAurWohhttps://t.co/x7BOPOhA8B@bhumipednekar @ananyapandayy @mudassar_as_is @junochopra @Aparshakti @manurishichadha @itsBhushanKumar @TSeries
">Ya toh Araam hi Araam hamari kismat mein nahi likha ya apne hi Pita ke haathon chu*** bane hain hum😬
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) November 4, 2019
Miliye #ChintuTyagi se #PatiPatniAurWohhttps://t.co/x7BOPOhA8B@bhumipednekar @ananyapandayy @mudassar_as_is @junochopra @Aparshakti @manurishichadha @itsBhushanKumar @TSeriesYa toh Araam hi Araam hamari kismat mein nahi likha ya apne hi Pita ke haathon chu*** bane hain hum😬
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) November 4, 2019
Miliye #ChintuTyagi se #PatiPatniAurWohhttps://t.co/x7BOPOhA8B@bhumipednekar @ananyapandayy @mudassar_as_is @junochopra @Aparshakti @manurishichadha @itsBhushanKumar @TSeries
हेही वाचा -'पानीपत'च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला...